सोशल मीडियाच्या दुनियेत कधी आणि काय पाहायला मिळेल हे कुणीच सांगू शकत नाही. सध्या सर्वांना थक्क करणारा एक व्हिडिओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडिओ एका माकडाचा आहे. तुम्ही आतापर्यंत माकडाला इथून तिथे उड्या मारताना पाहिलं असेल, काही माकडांनी लोकांच्या हातातील वस्तू पळवून नेलेलं पाहिलं असेल. अनेकदा तर माकडांच्या मस्तीचे व्हिडीओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण सुरीला धार करणारं माकड तुम्ही पाहिलाय का ? होय, हे खरंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर करण्यासोबतच त्याने कॅप्शन दिले आणि लिहिले की, ‘आम्ही तयार आहोत’. या व्हिडिओमध्ये माकड माणसांप्रमाणेच चाकूला धार लावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, व्हिडिओमध्ये, माकड प्रथम भांड्यात असलेल्या पाण्याने चाकू ओला करतो, नंतर दोन्ही बाजूंनी दगडावर चाकू घासून त्याची धार करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर सुमारे हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजर्सने प्रतिक्रिया देताना तिने लिहिले की, ‘अरे देवा, मी हे सर्व काय पाहतो आहे.’ दुसऱ्या युजर्सने लिहीलं आहे की, ‘चला आधी माकडाशी सामना करू’, तर तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की माकड ‘आरपारच्या लढाईची तयारी करत आहे’.