प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांना प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ खूपच आवडत असतात. नेहमीप्रमाणे आजही सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत, हा कौटुंबिक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडला असून या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे.

आई ही आई असते. ती कोणाच्याही मुलांमध्ये कधी फरक पाहत नाही. मग ती मानवाची मुले असोत, किंवा प्राणांची मुले असोत. ती आई माणसाची आई असो की प्राणी, पक्षांची आई असो…. हा प्रत्यय एका महिलेने दिला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला कुत्रीच्या पिल्लांना खायला घालत असल्याचं दिसून येत आहे. हे पाहून मदर डॉग त्या महिलेचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्री तिच्या अवतीभवती फेऱ्या मारताना दिसून येत आहे आणि तिची भुकेलेली पिल्ले या महिलेच्या अवतीभवती गोळा होत तिने आणलेला खाऊ खात आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक अनेक प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking video of washing carrot in river water by vendor
लोकांच्या जीवाशी खेळ! गाजर विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; भाजी विक्रेत्यांचा घृणास्पद VIDEO व्हायरल

आणखी वाचा : ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ म्हणत बाप-लेकीच्या जोडीने लाखो लोकांना वेड लावलं, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हायरल व्हिडीओ Yoda4ever नावाच्या एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक सुद्धा मिळत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाख ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत. प्रेमाचा, करुणेचा संदेश देणारा हा व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय.