scorecardresearch

Premium

‘शिकार करो या शिकार बनो’ सिंहाच्या कळपानं हत्तीच्या जुळ्या पिल्लांवर केला हल्ला; हृदयद्रावक VIDEO व्हायरल

Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे.

Mother Elephant Gives Up on a Twin to Save the Other from Lions video goes viral
सिंहाच्या कळपानं हत्तीच्या जुळ्या पिल्लांवर केला हल्ला (Photo: @Latestsightings)

Shocking video: शिकार करो या शिकार बनो हा जंगलाचा नियम आहे. जंगलात जिवंत राहायचं असेल तर शिकार करता यायला पाहिजे किंवा स्वत:चं संरक्षण करता यायला पाहिजे. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते परंतु जेव्हा त्याचा सामना वनराज हत्तीशी होईल तेव्हा काय होईल. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आई ही आईच असते. मग ती प्राण्यांची असो वा माणसांची. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये हत्तीचा सिंहाच्या एका गटाशी सामना होतो. मात्र यावेळी तो एकटा नसून त्याच्यासोबत त्याची दोन जुळी पिल्ले ही आहेत. आता त्या दोन पिल्लांना या सिंहाच्या कळपापासून वाचवण्याचं मोठं आव्हान हत्तीसमोर असताना काय होत पाहा.

minor girl ran away from forest half-naked young man who tried to rape was arrested
मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक
Yash Chouhan Delhi Murder Case
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
mumbai fire breaks out at penthouse of goregaon high rise
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश

हा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. पण नेमकं घडलं तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं झालं असं की, जंगलात हत्ती आणि हत्तीची दोन पिल्ले पाणी पिण्यासाठी विहीरीजवळ गेली होती. याचवेळी त्याठिकाणी सिंहाचा कळपही आला. बघता बघता या सिंहाच्या कळपानं हत्ती आणि हत्तीच्या नुकत्याच जन्मलेल्या दोन पिल्लांना घेरलं. माता हत्तीने सिंहांना रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण काही वेळातच तिला तिच्या एका बाळाला गमवावं लागलं. हत्तीचा कळप एका बाळाची शिकार करण्यात यशस्वी झालं. यावेळी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, हत्ती मोठ मोठ्यानं ओरडत आहे. जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महिलेनं केलं धाडस! हेलिकॉप्टर हवेत असताना मारली उडी; थरारक VIDEO झाला व्हायरल

हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “खूप वाईट झाले.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother elephant gives up on a twin to save the other from lions video goes viral srk

First published on: 08-12-2023 at 10:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×