Stunt video: आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण वेगवेळे स्टंट करत असतात. शिवाय ज्या लोकांना स्टंट करण्याची आवड असते ते इतरांपेक्षा वेगळा आणि धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण कधीकधी हे लोक असे काही जीवघेणे स्टंट करतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका महिलेने केलेल्या भयानक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. तिनं चक्क उडत्या हेलिकॉप्टरला उलटं लटकून खतरनाक स्टंटबाजी केली आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणे रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये पहायला मिळतातच. मात्र हे कधीकधी जिवावर बेतू शकतं याचा विचार करत नाही.

woman organised a divorce party after husband separation enjoying party and dancing
अजबच! घटस्फोटानंतर महिलेने ठेवली Divorce Party; डान्स करत केले जंगी सेलिब्रेशन: पाहा Video
doors of Khadakwasla Dam opened due to heavy rain
पुण्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्यानंतरचे दृश्य! व्हिडीओ होतोय व्हायरल
Pimpri Chinchwad, Hit and Run, Pimpri Chinchwad Hit and Run and run case, Car Accident, Pedestrian, CCTV Footage, Driver Fleeing, Pimpri Police, pimpri chinchwad news,
Video : पिंपरीत पादचारी महिलेला कारने उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल 
Policeman Fiercely Assaults PMPML Bus Driver
‘कॉलर पकडली, बुक्या मारल्या…पुणे पोलिसाची PMT बसचालकाला बेदम मारहाण, Video Viral
Girl Caught by Dad with Boyfriend at bus stand video goes viral
तरुणी बॉयफ्रेंडबरोबर करत होती रोमान्स अन् तेवढ्यात झाली वडिलांची एन्ट्री; VIDEO होतोय तुफान व्हायरल
Train Fight Viral Video
रेल्वेत सीटवर बसलेल्या तरुणाला मारहाण करत होता व्यक्ती, भडकलेल्या तरुणाने चेहऱ्यावर मारली जोरात लाथ अन्…Video व्हायरल
"Viral Video Shows Bus Overtaking Bus Overtaking Another Bus
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ओव्हरटेकिंग करण्याचा नादात तीन बसचा झाला असता मोठा अपघात; पाहा थरारक Video Viral
Worli Hit and Run Case
Worli hit and Run: वरळीतल्या त्या भयंकर अपघाताच्या आधी काय काय घडलं? काय होता घटनाक्रम?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला कोणत्याही सुरक्षेशिवाय हेलिकॉप्टरमधून खाली पाण्यात उडी मारत आहे. ही नॉर्मल उडी नाहीये, तर हॅलिकॉप्टरला लटकून मग बॅक फ्लिप मारत तिनं पाण्यात उडी मारली आहे. एवढ्या उंचावर हॅलिकॉप्टरमधून हा स्टंट करणं सोपं नाहीये मात्र या महिलेनं स्टंट मारुन दाखवलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> या ७ डॉक्टरांचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल; केलं असं काही की…

हा धक्कादायक आणि भयानक स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ellietsmart नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.  परंतु असे स्टंट करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याच्या कमेंट्स नेटकरी व्हिडीओवर देत आहेत. तर अनेकजण त्याच्या धाडसाचं कौतुक देखील करत आहेत.