‘आई तू किती करतेस ग माझ्यासाठी’ म्हणायला गेलं तर एक छोटसं वाक्य, पण ते बोलण्यासाठी आपल्याला ‘मदर्स डे’ची वाट का बघावी लागते? दिवस रात्र ती माय आपल्यासाठी आणि आपल्या सुखासाठी राबत असते, पण तिचे कष्ट, तिची तळमळ मात्र आपल्याला कळतच नाही. या जगात आई ही एकमेव व्यक्ती असेल की जी आपण या जगात पाऊल ठेवण्याआधीपासूनच आपल्यावर प्रेम करत असते. ठेच आपल्याला लागली तरी दु:ख तिला होतं. आपण हे सारं काही जाणत असतो, तिची काळजी, तिचं प्रेम हे सारं कळत असतं, पण का कोण जाणे तिच्यापाशी आपल्या भावना मात्र व्यक्त करता येत नाही. म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी लोकसत्ताने आपल्या वाचकांना दिली होती. तेव्हा वाचकांनी आईबद्दलच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यात, त्यातल्याच काही निवडक संदेशांचे संकलन.

‘आई तुझ्याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण तूझी स्तुती करू शकेल असे शब्द ह्या जगतात नाही….. एकच सांगेन आई तू म्हणजे अशी साऊली आहे जी नेहमी माझ्या सोबत असते, जी उजेडातही आणि अंधारातही पुढे असते.. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत’
– प्रसाद गिते

‘She can’t be bound by words. Every mother is priceless and unique creation of God for her child. Who needs love, attention, care and respect. Respect every Mother may be it be yours or anyone else’s’

– सुमेध भष्टे

‘देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने तूला निर्माण केलंय आई. आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि वात्सल्याची जननी आहे. तूझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई.!!!’
– प्रदीप पावस्कर

‘आई विषयी जास्त काही बोलू शकत नाही. फक्त एवढ बोलू शकतो की तुझ्या सारख दैवत कुठे नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुला मी नेहमीच आंनदित ठेवीन’

– योगेश शिंदे

‘माझ्या आईला ‘मदर्स डे’ वगैरे काही माहिती नाही. पण आम्ही तिच्यासाठी दरवर्षी मोठा केक घेऊन जातो तिच्यासाठी हा सुखद धक्काच असतो. तिला हे पाहून नेहमीच आनंद होतो . प्रत्येकाला ती एकच सांगते माझ्या मुलांना माझी लय काळजी हाय माझ्यासाठी मोठा केक आणत्यात आणि मला कापायला लावत्यात. तिचा चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून फार बरं वाटतं. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काही वेगळाच असतो. ‘
– संतोष शिर्के
‘I love u mom, मला तूझी खूप आठवण येते, जेव्हा मी इतरांच्या आईकडे बघते तेव्हा आई नसण्याचे माझे दु:ख अधिक तीव्र होत जाते.’

– विश्वयानी परब

‘आई तू खूप खूप चांगली आहे’

– मुग्धा पिंपळनेरकर

‘आई-बाबा विषयी कितीही लिहिले तरी ते कमीच आहे. त्यांना शब्दांत बांधून ठेवून लहान नाही करायचं.’

– नंदकुमार सागर 

‘प्रिय आईस,
लहानपणी तू दिलेले संस्कार जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी होत आहे. तू खऱ्या अर्थाने माझं जीवन आनंदमयी केलीस. ‘
– रोशनी बाफ्ना