Mother’s Day 2025 Viral Video : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी! ही ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एखाद्याकडे कितीही पैसा असो पण त्याच्याकडे आई नसेल ती संपत्ती व्यर्थ ठरते. आईशिवाय लेकराचं आयुष्य अपूर्ण असते. बाळाला बोट धरून चालायला शिकवण्यापासून आयुष्यात स्वत:च्या पायांवर उभे राहण्यापर्यंत सर्व काही आई मुलांना शिकवते. हे मातृत्व फक्त मानवापुरते मर्यादीत नाही, पशु-पक्ष्यांमध्ये मातृत्व अनेकदा पाहायला मिळते. जेव्हा गाय आपल्या वासराला प्रेमाने चाटते किंवा दुध पाजते त्यांच्यातील मातृत्व दिसते. जेव्हा चिमुकल्या पिल्लांना कुशीत घेऊन किंवा मस्ती करणाच्या पिल्लांना अलगद पण तोंडात उचलून घेऊन येणारी मांजर पाहिली तिचे मातृत्व दिसते. अशाच मातृत्वाची झलक दाखवणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जगभरातील लोकांनी २०२५ चा मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या आईसाठी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, एका छायाचित्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक पक्षी आपल्या पिल्लांना अन्न खाऊ घालत आहे. या हृदयस्पर्शी फुटेजने इंटरनेटवरील लोकांचे अश्रू अनावर झाले आहेत.
हा व्हिडिओ फोटोग्राफर मयंक तिवारी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, मयंक पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ अचूक क्षण टिपण्यासाठी धीराने वाट पाहत असल्याचे दिसत आहे. तो नमूद करतो की, तो चांगला फोटो काढण्यासाठी त्या स्थितीत दोन तास वाट पाहत होता. त्यानंतर व्हिडिओमध्ये पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ घालतानाचा क्षण दाखवतो. हा भावनिक क्षण मातृत्वाची झलक दाखवतो.
मयंकने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “माँ तो माँ होती है! (शेवटी आई ही आई असते). सर्व अद्भुत मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!” हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. अनेकांना आपल्याया स्वतःच्या आईच्या प्रेमाचे, कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे क्षणांची आठवण झाली.
एका वापरकर्त्याने कमेंट केली, “दिवस सार्थकी लावला भाऊ तू तर.” दुसऱ्या वापरकर्त्याने मयंकच्या संयमाचे कौतुक केले आणि लिहिले, “वाह, खूप संयम असलेला छायाचित्रकार.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, बरोबर बोलला भाऊ, आई ही शेवटी आई असते” आणि “या व्हिडीओबाबत भावना व्यक्त करण्यासाठी काही शब्द नाहीत, फक्त गोंडस.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “इतका सुंदर क्षण टिपण्यासाठी आतापर्यंतची सर्वोत्तम भावना.” या व्हिडिओला १ लाखाहून अधिक लाईक्स, हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत आणि इंस्टाग्रामवर तो अजूनही लक्षणीयरीत्या लोकप्रिय आहे.