MS Dhoni Suggests Man To Visit Pakistan Once For Food : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्यामुळे त्याची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्याचे चाहतेही सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेअर करत असतात. धोनीचे फॅन इतके क्रेझी आहेत की, ते त्याला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही वेगळेच पाहायला मिळत आहे. धोनीने त्याच्या एका चाहत्याला जेवायला जाण्यासाठी एक जागा सुचवली, पण त्या व्यक्तीने त्याला नकार दिला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धोनी एका रेस्टॉरंटच्या काउंटरवर उभा आहे. यावेळी तो तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीशी बोलत आहे. दोघांमध्ये जेवणाबाबत चर्चा सुरू असते. यावेळी धोनी त्या व्यक्तीला म्हणतो की, ‘तुम्ही एकदा पाकिस्तानात जेवायला जा.’ धोनीच्या या सूचनेवर तो व्यक्ती म्हणतो की, ‘तुम्ही चांगले जेवण सुचवले तरी मी तिकडे जाणार नाही, मला जेवण आवडते, पण मी तिथे जाणार नाही.

cab driver behind the cab wrote quotes on that the boys become emotional after reading it watch viral video
कॅब ड्रायव्हरने गाडीवर लिहिले असं काही की PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “मुलांच्या वेदना कोणी…”
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
Viral Video
Viral Video : पोलिस अधिकाऱ्याने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ, व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, याची पुष्टी झालेली नसली तरी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

लोक काय म्हणाले?

हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वी ट्विटर) @Sports_Himanshu नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एमएस धोनी म्हणाला, ‘तुम्ही एकदा पाकिस्तानला जेवायला जा, हे अमेजिंग आहे.’ आत्तापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, खरंच, कोणालाही पाकिस्तानात जायचे नाही. दुसर्‍या युजरने लिहिले, भावा, आम्हाला जेवून परतही यायचे आहे, कोणास ठाऊक आम्हाला बॉम्ब मिळाले तर…, आणखी एका युजरने लिहिले, पाकिस्तानमध्ये पिठाचा तुटवडा आहे, माही भाईला कोण सांगेल.