मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर! ‘हे’ आहे कारण

मुंबईच्या डबेवाला असोसिएशनने यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Mumbai Dabbawalas to go on 6 day break
मुंबईतले डबेवाले घेणार सहा दिवस सुट्टी (फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)

लोकल ट्रेनला मुंबईची रक्तवाहिनी म्हटलं जातं, तर मुंबईचे डबेवाले हे मुंबईकरांची भूक भागवतात. कारण ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळी डबा नेऊन देण्याचं त्यांचं कसब हे गेली वर्षानुवर्षे आपण सगळेच पाहात आलो आहोत. अशात आता हे मुंबईचे प्रसिद्ध डबेवाले सहा दिवसांची सुट्टी घेणार आहेत. ३ ते ९ एप्रिल या कालावधीत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर असतील. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा हे डबेवाले आपलं डबे पोहचवण्याचं काम सुरू करणार आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मुंबईचे डबेवाले ३ ते ९ एप्रिल या कालावधीत सुट्टीवर

मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून ९ एप्रिलपर्यंत सुट्टीवर जाणार आहेत. ३ ते ९ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतले बहुसंख्य डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून डबेवाले आपलं काम पुन्हा सुरू करतील.गावांमधल्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी हा ब्रेक घेतला आहे.

मुंबईत काम करणारे हे डबेवाले मुख्यतः मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला, संगमनेर भागातल्या गावांमधले आहेत. या ठिकाणी आता कुलदैवतांच्या यात्रा सुरू होती. या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतले हे डबेवाले सुट्टी घेणार आहेत.

डबेवाला असोसिएशनने व्यक्त केली दिलगिरी

मुंबईतल्या नोकरदार वर्गाचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. मुंबईतल्या कार्यालयांमध्ये जेवण पोहचवण्याचं काम हे डबेवाले अविरतपणे करत असतात. मुंबईतल्या नोकरदारांची या सहा दिवसांच्या कालावधीत गैरसोय होणार आहे. मात्र याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशन दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच या सहा दिवसांच्या कालावधीतला पगार कापू नये अशीही विनंती डबेवाला असोसिएशनने केली आहे. याआधी २०१९ मध्ये डबेवाले चार दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. करोना काळात त्यांच्या सेवेवरही परिणाम झाला होता. त्यावेळी त्यांना सरकारने मदत केली. आता डबेवाल्यांची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र सहा दिवस ते सुट्टी घेणार आहेत. १० एप्रिलपासून मुंबईचे डबेवाले पुन्हा आपली सेवा सुरू करणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 12:11 IST
Next Story
‘यूपी का रोड बा…’ आमदार रस्त्याची पाहणी करायला गेले आणि बुटाबरोबर डांबरही उडाले, पाहा Viral Video
Exit mobile version