धावत्या जीवनशैलीमध्ये लोकलच्या वेगाने धावण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण गाड्यांची संख्या मात्र वाढत नाहीये. परिणामी लोकांना प्रचंड गर्दीमध्ये, धक्काबुक्की करत प्रवास करावा लागतो. जीव मुठीत घेऊन लोकलमध्ये चढावे आणि उतरावे लागते. त्यामुळे लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत चालला आहे. सोशल मीडियावर रोज अनेक प्रवाशांच्या अपघाती मृत्यूचे व्हिडिओ समोर येत असतात पण तरीही लोकांना प्रवास करताना थोडी शिस्त बाळगण्याची आवश्यकता वाटत नाही. अनेकदा प्रवाशांच्या बेशिस्तपणा आणि नियम उल्लघंनामुळे अपघात होऊ शकतात. असाच काहीचा प्रकार दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ एका रेल्वेस्टेशनचाचा आहे जिथे, प्रवासांचा अपघात होऊ नये म्हणून जिन्याशेजारील रेल्वे रुळाजवळ बॅरेगेट लावण्यात आले होते पण त्याचे सळया गायब झालेल्या दिसत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे काही प्रवासी लोकल या या स्थानकावर थांबल्यानंतर काही बेशिस्त प्रवासी या बॅरीगगेडमधून बाहेर येत आहेत. प्रवाशांना जिथून जाण्यासा मनाई तिथून हे प्रवासी जात आहे आणि शिवाय आपला जीवही धोक्याक घालत आहे. येथे इतकी कमी जागा आहे चुकून कोणाचा पाय घसरला किंवा लोकल सुरु झाली तर एखाद्याचा जीव जावू शकतो. व्हिडीओमध्ये पुढे हे बॅरीगेड दुरुस्त केल्याचे दिसत आहे. पण त्यानंतरही बेशिस्त प्रवाशांना येथूनच बाहेर येत आहे. काही लोक तर जिन्यावर लोकलमधून चढण्या उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना या लोकांवर रोष व्यक्त केला.

– हेही वाचा – “अहो काकू… हे काय करताय?” भररस्त्यात ठेवली खुर्ची, त्यावर ठेवला मोबाईल अन् बिनधास्तपणे नाचू लागली महिला; Viral Video पाहून संतापले नेटकरी

व्हिडिओ इंस्टाग्रामवर borivali_churchgate_bhajan
नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”तुमच्या जीवाशी खेळू नका, धोका पत्करला पाहिजे पण तुमच्या आयुष्यात धोक्यात टाकले नाही पाहिजे”

हेही वाचा –कौतुकास्तद! ८२ वर्षांच्या आजोबांनी झाडला रस्ता! नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतुक, Viral Video बघाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेट केली की, “हे लोक सुधारणार नाही”

दुसऱ्याने कमेंट केली, “सुरुवातीला ते बॅरीगेड कोणी तोडले असतील?”

तिसऱ्याने लिहिले की, “असे अडथळे निर्माण करून विनाकारण अडचण निर्माण करतात दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रेन उतरणे सुलभ केले पाहिजे.