सोशल मिडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ आणि घटना समोर येत असतात ज्या धक्कादायक असतात. यामध्ये काही घटना अशा असतात की ज्या माणुसकीचे दर्शन घडवितात. सध्या असा एक फोटो चर्चेत आला आहे. मुंबई पोलिसमधील एका हवालदारचे सध्या सोशल मिडियावर कौतुक होत आहेत कारण त्याने एका दुर्घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलेची मदत केली आहे. मुंबई पोलिसांनी ‘एक्स’ ( पुर्वीचे ट्विटर)वर हवालदार संदीप वाकचौरे यांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते एका महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे.

त्याचे झाले असे की, एक ६२ वर्षीय वृद्ध महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी जात होती तेव्हा रस्ता ओलांडताना एका दुचाकी वाहनाची तिला धडक बसली. हे पाहून हवालदार वाकचौरे त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले त्यांनी अँब्युलन्स येण्याची वाट पाहिली नाही. वेळेत उपचार मिळावे म्हणून महिलेला थेट उचलून घेतले आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

हेही वाचा – पुणे तिथे…” चांदणी चौकातून कुठे आणि कसे जायचे याचे मिळणार क्लासेस? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य

मुंबई पोलिसांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ”नेहमी ड्युटीवर! १६ ऑगस्टला आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी हॉस्पिटल जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला जेव्हा रस्ता ओलांडताना एका दुचाकीने धडक दिली. त्यावेळी ऑन ड्युटी पोलीस हवालदार संदीप वाकचौरे यांनी त्वरित या महिलेच्या मदतीसाठी पोहचवले आणि तिचा जीव वाचवला.”

हेही वाचा – पेमेंटसाठी रिक्षा चालकाने चक्क स्मार्ट वॉचमध्ये दाखवला QR code; ग्राहक झाला चकित, व्हायरल झाला फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “ पोलीस हवालदार संदीप वाकचोरे यांना माझा सलाम. उत्कृष्ट, ब्रावो.” तर दुसरा म्हणाला, ” गुड जॉब मुंबई पोलिस,” नंतर तिसऱ्याने कौतुकाने लिहिले, ” महान माणसुकीचा पुढाकार” तर, चौथ्याने लिहिले, “मला आशा आहे की आयुक्तांनी पोलिस हवालदार वाकचोरे यांच्या पुढाकाराला मान्यता दिली आहे ज्यामुळे एक जीव वाचला आहे.”