कित्येकांच्या आजूबाजूच्या परिसरातील उद्यान आता कित्येकांसाठी खुल्या व्यायामशाळेचे (Open GYM) उपयुक्त ठिकाण बनले आहे. सध्या उद्यान किंवा काही पर्यटनस्थळांवर व्यायामाची उपकरणे बांधलेली दिसून येतात. सकाळ, संध्याकाळ मोकळ्या हवेत अशा उद्यानामध्ये व्यायामासाठी व्यायाम उपकरणांवर अनेकांची गर्दी झालेली दिसते. आज नागालँडचे मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्गसुद्धा अशा ‘ओपन जिम’मध्ये व्यायाम उपकरणांचा लाभ घेताना दिसून आले आहेत आणि व्यायाम करताना त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे.

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती व नागालँडचे मंत्री तेमजेन स्काय वॉकर या उपकरणाचा उपयोग करून व्यायाम करताना दिसत आहेत. स्काय वॉकर हे सर्वोत्तम मैदानी फिटनेस उपकरणांपैकी एक आहे. या स्काय वॉकरवर नागालँडचे मंत्री तेमजेन लहान मुलांप्रमाणे झोका घेताना दिसत आहेत. नागालँडचे मंत्री तेमजेन यांचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

हेही वाचा…भारतातील ‘हा’ सगळ्यात सुंदर विमानतळ तुम्ही पाहिला आहे का? परदेशी यूट्युबरलाही पडली भुरळ; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नागालँडचे मंत्री तेमजेन आणि एक अज्ञात व्यक्ती एका गार्डनमध्ये स्काय वॉकरचा उपयोग करून व्यायाम करीत आहेत. तसेच तेमजेन व्यायाम करता करता स्काय वॉकरवर अगदी लहान मुलांप्रमाणे झोका घेतानासुद्धा दिसत आहेत. तर तेमजेन यांना लहान मुलांप्रमाणे झोका घेताना पाहून उपस्थित मंडळींमध्ये हास्याची एकच लाट पसरल्याचे दिसून आले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) @AlongImna या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करीत, ‘दिल तो बच्चा है जी’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे आणि व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्येसुद्धा हेच गाणे तुम्हाला ऐकू येईल. हा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘तुम्हीसुद्धा लहान मुलांसारखेच आहात. पण, जसेही आहात; हृदयाच्या अगदी जवळचे आहात’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे आणि मजेशीर ट्विटमुळे नागालँडचे पर्यटनमंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग नेहमीच चर्चेत असतात. या व्हिडीओमुळे ते आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत