हल्ली पिझ्झा कोणाला आवडत नाही, असा शोधूनही कोणी सापडणार नाही. घरात तरूण मुलांनी जर एखादं स्ट्रीट फूड मागवलं तर घरातल्या एका कोपऱ्यातून ‘काय हल्लीची पिढी…अशाच खाण्यामुळे कमजोर होत चालली आहे..’ असा सूर आजी-आजोबांकडून येताना आपण पाहिलंय. पण स्वतः आजीच जंकफूड खाताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. सध्या अशाच एका पिझ्झाप्रेमी आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. पहिल्यांदा पिझ्झाची चव चाखल्यानंतर या आजीबाईंच्या चेऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की. एकदा हा व्हिडीओ पाहाच.
हल्ली स्ट्रीट फूडचा ट्रेंड इतका वाढलाय की तरूण पिढींच्या बरोबरीने आता ज्येष्ठांनाही जंकफूडचं वेड लागलंय. सध्या व्हायरल होणाऱ्या पिझ्झाप्रेमी आजीबाईंचा व्हिडीओ याचाच पुरावा देतोय. अनेकदा घरातली ज्येष्ठ मंडळी त्यांच्या नातवंडांना पौष्टिक जेवण खाऊ-पिऊ घालताना दिसून येत असत. पण आता काळ बदललाय. आता नातवंड आपल्या आजी-आजोबांना स्ट्रीट फूड खायला शिकवू लागले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन आजी बेडवर बसलेल्या दिसतात. पिझ्झामधून एक स्लाईस काढनू एक आजी दुसऱ्या आजीला देत असते. पिझ्झाची स्लाईस पाहून सुरूवातीला तर या आजी खाण्यासाठी डगमगतात. पण नंतर पुन्हा त्यांचा विचार बदलतो आणि त्या पिझ्झाची स्लाईस खाण्यासाठी घेतात.
या आजीबाई पहिल्यांदाचा पिझ्झाची चव चाखणार होत्या, म्हणून घाबरत घाबरत या आजीबाई पिझ्झा खाताना दिसून येत होत्या. पिझ्झाची चव चाखल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव दिसून आले ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. पहिल्यांदा पिझ्झा खाताना या दोन्ही आजी हसत हसत चव चाखताना दिसून येत आहेत. पिझ्झाची चव या आजीबाईंना नवीनच होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भीति बरोबरच आश्चर्याचेही भाव एकत्र उमटले. हे पाहून त्यांच्या नातूला मात्र भलताच आनंद झाला. हाच आनंदी क्षण त्यांच्या नातूने कॅमेऱ्यात टिपला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘या’ छोट्या मुलीने गोड आवाजात ऐकवली अमृता प्रीतम यांची ‘मैं तेनु फिर मिलांगी’ कविता
आणखी वाचा : PHOTOS : सर्वात मोठी मिशीवाला कोण आहे? दाढी-मिशीच्या या अनोख्या स्पर्धेचे PHOTO VIRAL
पहिल्यांदा पिझ्झा खाणाऱ्या या आजीबाईंचा हा व्हिडीओ greesh_bhatt_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘आजीबाईने पहिल्यांदाच पिझ्झा खाल्ला’ अशी कॅप्शन देत त्यांनी आजीबाईंचा हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधील आजीबाईंचे हावभाव पाहून मन उल्हासित झाले आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. इन्स्टाग्राम रीलवर या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. “बहुतेक आजींना पिझ्झाची चव आवडलेली नाही.” अशी प्रतिक्रिया काही युजर्स देताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या यूजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, पिझ्झा खाल्लानंतर आजीबाईने जे हावभाव दिले ते मला सर्वात जास्त आवडले.” तिसऱ्या युजरने लिहिलं, “आजीबाई फारच क्यूट दिसत आहे.”