पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. जगात काही मोजके राजकारणी आहेत ज्यांचे या मायक्रोब्लॉगिंग साईटवर एवढे फॉलोअर्स असतील. मोदीही ट्विटरवर खूपच सक्रीय असतात आणि मोठ्यांपासून अगदी सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांच्याच ट्विटला उत्तर देण्याचे ते प्रयत्न करतात. अनेकदा नेटिझन्सने केलेल्या तक्रारींचीही त्यांनी स्वत:हून दखल घेतली आहे. तेव्हा त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अधिक का आहे, हे वेगळं सांगायला नको. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने ‘मी मोदींसाठी नाही, तर मोदी माझ्यासाठी काम करतात’ असे ट्विट केले होते. मोदींनीही लगेच या तरूणाच्या ट्विटची दखल घेत त्याला असे काही उत्तर दिले होते की त्यांनी सगळ्यांचेच मन जिंकले होते. अर्थात या मुलाने ट्विट केल्यानंतर त्याच्या ट्विटवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण मोदींनी मात्र त्याची बाजू घेत तो कसा बरोबर आहे, हे पटवून दिले होते. ‘तो बरोबर बोलतोय, मी त्याच्यासाठी आणि समस्त भारतीय नागरिकांसाठी काम करतो.’, असे ट्विट करत त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली होती. आता पुन्हा एकदा आपल्या हटके उत्तराने मोदींनी अनेकांच्या मनात घर केले आहे.

वाचा : केरळच्या आमदार आणि IAS अधिकाऱ्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

वाचा : आनंद महिंद्रांनाही आवडली या माणसाची ‘डोकॅलिटी

दोन दिवसांपूर्वी केदारनाथ मंदिरांचे प्रवेशद्वार भक्तांसाठी पुन्हा एकदा खुले करण्यात आले. मोदींच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडला. बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात सहा महिन्यांसाठी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येते. यावेळी मंदिरातले काही फोटोही मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले होते. यावर अनित घोष या युजरने एक प्रश्न मोदींना विचारला. केदारनाथकडे तुम्ही काय मागितलं, असा प्रश्न त्याने हे फोटो पाहून विचारला. आता यावर मोदींकडून उत्तर मिळण्याची त्याला काही आशाच नव्हती. पण अगदी अनपेक्षितपणे मोदींनी अनितचे ट्विट वाचले आणि त्याला उत्तरही दिले. ‘भारताचा विकास आणि प्रत्येक भारतीय नागरिकांची प्रगती व्हावी हेच मागणं मी देवाकडे मागितले, असं ट्विट करत मोदींनी त्याचेच काय पण सगळ्यांच भारतीयांची मनं जिंकली. या उत्तराने ट्विटरवर ते सगळ्यात लोकप्रिय का आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले.