एखाद्या कार्यक्रमानिमित्त कोणत्याही वास्तुची सजावट करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला विशेष प्रसंगासाठी शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी फुलांची निवड केली जाते. फुलं सर्वांनाच आकर्षित करतात. पण जर एखाद्या फुलात तुम्हाला बेडुक लपलेला दिसला तर? तुम्ही लगेच ते फुल फेकून द्याल, सुंदर फुलामध्ये असे काही आढळणे काही जणांना किळसवाणे वाटेल. असेच काहीसे दृश्य सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण यामध्ये यामध्ये एक, दोन नव्हे तर असंख्य फुलांमध्ये बेडुक लपून बसले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ :
Viral Video : म्हणून त्याने चक्क गाढवावरून काढली वरात; कारण जाणून तुम्हालाही आवरणार नाही हसू
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. असंख्य सुंदर गुलाबी फुलांमध्ये बेडूक लपलेले पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून, त्यांनी व्हिडीओवर कमेंट करत हे दृश्य खूप आकर्षक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.