राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यामधील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे ते बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व आमदार गुवहाटीमध्येच असून ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्या असून सध्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे. राज्यात सुरु असणाऱ्या याच राजकीय घडामोडींवरुन निलेश राणेंनी महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

निलेश राणे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्विटरवरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दिसत आहेत. ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याचं पहिल्यांदा समोर आलं त्या दिवशी म्हणजेच २१ जून रोजी निलेश राणेंनी, “ठाकरेंचे दिवस फिरले,” असं ट्विट केलेलं. २२ जून रोजी, “शिवसेनेचे ११/१२ आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन आयपीएल टीमसाठी तयारी करा… मातोश्री ११ बनवा,” असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला होता.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी फेसबुक लाइव्हवरुन जनतेशी संवाद साधल्यानंतरही शिंदे समर्थक आमदारांची संख्या वाढतानाचं चित्र दिसत आहे. दादरचे सदा सरवणकर, मंगेश कुडाळकरही रात्रीपासून संपर्कात नसून हे आमदार सुद्धा शिंदेंसोबत गुवहाटीमध्ये असल्याचं दुपारपर्यंत स्पष्ट झालं. मात्र सकाळी ही बातमी समोर आल्यानंतर, आज सकाळी निलेश राणेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. “५० आमदार तसेच मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको,” असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. पुढच्याच वाक्यामध्ये निलेश राणेंनी, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी हे कमवलं,” असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही, कारण…”; आठवलेंचं वक्तव्य, कविताही केली सादर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा हा प्रशासकीय निवासस्थानावरुन आपला मुक्काम ‘मातोश्री’ बंगल्यावर हलवला. यावरुनही निलेश राणेंनी, “दुसऱ्यांची घरं पाडणार्‍या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावले,” अशी प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली होती.