फेसबुकवर गेल्या आठ वर्षांपासून निशा जिंदल नावाने वावरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस कोठडीत आणताच त्याला पोलिसांनी, “मी पोलिस कोठडीत आहे… मीच निशा जिंदल आहे”, अशाप्रकारची पोस्टही करायला सांगितली. काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह जवळपास 10 हजार युजर्स त्याला फॉलो करत होते, तर चार हजारांपेक्षा अधिक फ्रेंड्स होते.
गेल्या 11 वर्षांपासून अभियांत्रिकेच्या परिक्षेत नापास होणारा छत्तीसगडच्या रायपूर येथील 31 वर्षीय रवी पुजार गेल्या आठ वर्षांपासून फेसबुकवर निशा जिंदल नावाने वावरत होता. The Print ने दिलेल्या वृत्तानुसार रवीला ताब्यात घेणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, “निशा जिंदल नावाची एक महिला सातत्याने जातीय संदेश पोस्ट करत असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे येत होती. आम्ही त्या आयडीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. 10 दिवस लक्ष ठेवल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो एक पोस्ट केल्यानंतर मोबाइल बंद करायचा, त्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करणं कठीण गेलं. 2009 मध्ये त्याने एका स्थानिक खासगी कॉलेजमध्ये इंजीनिअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण अद्याप डिग्री मिळवू शकलेला नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस स्थानकात पोहोचल्यावर त्याच्याकडून मीच निशा जिंदल आहे अशी पोस्ट जाणूनबुजून करायला सांगितली. त्याच्या १० हजार फॉलोअर्सना सत्य समजावं यासाठी ती पोस्ट त्याला करायला सांगितली”.
साम्प्रदायिक वैमनस्यता भड़काने के आरोप में जब @RaipurPoliceCG FB user “निशा जिंदल” को गिरफ़्तार करने पहुँची तो पता चला कि ११ साल से engineering पास नहीं कर पा रहे “रवि” ही वास्तव में “निशा”हैं!
“निशा” के >10,000 फ़ालोअर्ज़ को सच बताने पुलिस ने रवि से ही उनकी सच्चाई पोस्ट कराई! pic.twitter.com/x7RSCqRftn— Priyanka Shukla (@PriyankaJShukla) April 18, 2020
निशा जिंदल या आयडीवरुन रवी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याप्रमाणे पोस्ट करायचा. तर, कधी मोठ्या संस्थेत उच्च पदावर कार्यरत असल्याचा दावा करायचा. तर, कधी मी आता ३५ वर्षांची झाली असून अजून सिंगल आहे अशाप्रकारच्या पोस्ट पुरुषांना आकर्षित करण्यासाठीही करायचा. सध्या त्याच्या आयडीचे डिटेल्स घेतले जात आहेत. त्याने ब्लॅकमेल करुन किंवा क्राउडफंडींगद्वारे पैसे कमावलेत का याचा सध्या तपास सुरू आहे. तसेच, त्याच्या मेसेंजरमधून डिलीट केलेल्या मेसेजेसची हिस्ट्री देखील मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.