Nitin Kamath Said Curiosity Is Skill That Cannot Be Replaced By AI: गेल्या काही वर्षात झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उदयामुळे याचा हळू हळू अनेक नोकऱ्यांवर परिणाम होत असल्याचे पाहायल मिळत आहे. अशी अनेक कामे आहे जी पूर्ण करण्यासाठी तासनतास वेळ लागतो. पण, ही अनेक तास खाणारी कामे आता एआयमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये होऊ लागली आहेत. अशात, झेरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी एका कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे जे, कधीही कालबाह्य होणार नाही असे त्यांचे मत आहे. आणि कालबाह्य न होणारे हे कौशल्य, म्हणजेच माणवी कुतूहल आहे.
विविध विषयांवर सातत्याने आपली मते मांडणाऱ्या कामथ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “कुतूहल. मला वाटते की प्रत्येकाकडे उत्सुक राहण्याची क्षमता असायला हवी. एआयच्या जगात, उत्सुक लोकांना फायदा होईल.”
यावेळी नितीन कामथ यांनी स्पष्ट केले की, कुतूहल केवळ व्यक्तीच्या स्वतःच्या भूमिकेपुरते मर्यादित नसावे तर ते त्यांच्या सभोवतालच्या मोठ्या वातावरणापर्यंत पसरले पाहिजे.
कामथ यांनी एक्सवर त्यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबतचे संभाषण एक्सवर पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “विघ्नेश म्हणाला की, एआय दररोज आणखी हुशार होत चालले आहे, काही मिनिटांत किंवा अगदी सेकंदात गुंतागुंतीची कामे हाताळू शकतो आणि कम्युनिकेशन हेडला प्रोग्रामर बनवू शकतो, तेव्हा तुम्हाला असे कोणते कौशल्य वाटते ज्याच्यावर एआयचा कधीच परिणाम होणार नाही?”
यावर नितीन कामथ यांनी एका शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, “याचे उत्तर ‘कुतूहल’ आहे. मला वाटते की प्रत्येकाकडे उत्सुक राहण्याची क्षमता असायला हवी. एआयच्या जगात, उत्सुक लोकांना एक फायदा असेल. कशाबद्दल उत्सुकता बाळगावी? प्रत्येक गोष्टीबद्दल. कामाच्या बाबतीत, इतर प्रक्रियांबद्दल किंवा लोक करत असलेल्या इतर गोष्टींबद्दल उत्सुकता बाळगा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या समस्या सोडवू शकता का हे जाणून घेण्याची उत्सुकता बाळगा, इत्यादी.”
कामथ यांच्या मते, शिकण्याची, एक्सप्लोर करण्याची आणि प्रयोग करण्याची ही इच्छाच एआयच्या जगात लोकांना वेगळे स्थान मिळवून देईल. तंत्रज्ञान भयानक वेगाने प्रगती करत असले तरी, त्यांचा असा विश्वास आहे की, नवीन गोष्टी शोधण्याची, एक्सप्लोर करण्याची मानवी उत्सुकता आणि प्रयत्न करण्याची इच्छा एआय जगातही टीकून राहील.