“लाइट, दिव्यांची गरजच नाही”; महिलेच्या एलईडी दिव्यांच्या साडीवर नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट्स

तुम्ही कधी विचार केला होता का की एक दिवस लाईट साडीतही फिट होईल? सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

LED light sadi
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @vichupedia / Twitter )

तुम्ही बिग बींचा ‘याराना’ चित्रपट पाहिला असेल ज्यात अमिताभ बच्चन यांनी ‘सारा जमाना हसीनो का दीवाना’ या लोकप्रिय गाण्यावर लाईट वाला ड्रेस घालून डान्स केला होता. ज्यानंतर लोकांमध्ये त्या ड्रेसची क्रेझ खूप वाढली, पण तुम्ही कधी विचार केला होता का की एक दिवस लाईट साडीतही फिट होईल? सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने लाईटवाली साडी घातली आहे. तेवढ्यात दुसरी महिला तिथे येते आणि ती साडी पाहते. हा क्षण एका पुरुषाने कॅमेऱ्यात कैद केला आणि दुसऱ्या महिलेला खोलीची लाईट बंद करण्यास सांगितले. त्यावेळी ही साडी आणखीच चमकत आहे. हा जुनाच व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

( हे ही वाचा: जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क )

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “तुझी दीपावली साडी आहे? मला खात्री आहे की तुमच्या या साडीशी कोणी बरोबरी करू शकत नाही …” एकाने कमेंट केली. तर दुसरा म्हणतो की, “#AmitabhBachchan #SaaraZamaanaHaseenonKaDeewana #yaarana नंतर असे काहीही पाहिले नाही!!” जुना व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने ट्विट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No need for diyas netizens abandoned comments on a woman led lights saree ttg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या