Viral Video : सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकते. नुकतेच शालेय मुलींच्या एका ग्रुपने आकर्षक शैलीत ‘बटरफ्लाय’ या गाण्यावर व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला. या गाण्यावर या मुलींनी सुंदर डान्स स्टेप्स केल्या होत्या. अनेक जण या बटरफ्लाय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या ट्रेंडिग ऑडिओचा वापर करून ६,५०० हून अधिक रिल्स इन्स्टाग्राम तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक रिल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या रिलमध्ये कोणी तरुण मंडळी नाही तर वयोवृद्ध लोकं उत्साहाने डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आठ वयोवृद्ध लोकांचा ग्रुप दिसेल. या व्हिडीओत एक वयोवृद्ध आजोबा पांढरी लुंगी नेसून डान्स करताना दिसत आहे तर त्यांच्या पाठीमागे चार महिला आणि तीन पुरुष डान्स करत आहे. या व्हिडीओत हे वृद्ध आजी आजोबा हुबेहूब शालेय मुलींप्रमाणे डान्स करत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.हा व्हायरल व्हिडीओ Adaikkalam नावाच्या वृद्धाश्रमातील आहे. तेथील आजी आजोबांनी हा सुंदर व्हिडीओ बनवला आहे.

हेही वाचा : “दादर चौपाटीवर बसून आवडते मला बघायला समुद्राची लाट…” मुंबई प्रेमी महिलेने सांगितला भन्नाट उखाणा, पाहा व्हिडीओ

adaikkalam_free_oldage_home या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बटरफ्लाय गाणं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गोड दिसताहेत बटरफ्लाय” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, वय हा फक्त आकडा असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मूड फ्रेश झाला.”

शालेय मुलींचा व्हिडीओ पाहिला का?

शालेय मुलींनी ‘बटरफ्लाय राइम’ म्हणून फुलपाखरावर सुंदर गाणे म्हटले होते. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. शालेय गणवेशात शाळेच्या परिसरात त्यांनी या गाण्यावर सुंदर स्टेप्स करत डान्स केला होता. या स्टेप्स सुद्धा सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. अनेक जण त्यांनी गायलेल्या ऑडिओवर रिल्स बनवताना दिसत आहे.