हत्तींची गणना ही जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. सर्वसामान्यपणे हत्ती हे खूप शांत प्राणी असतात. पण त्यांना राग आल्यानंतर त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. म्हणूनच जंगलाचा राजा सिंह देखील हत्तीपासून थोडं अंतर ठेवूनच राहत असतात. सोशल मीडियावर हत्तीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या हत्तीच्या क्रोधाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
प्रवास करताना रस्त्यावर ट्रॅफिक दिसलं की प्रत्येक वाहन चालकाचा संताप होतो. ट्रॅफिकचा हा संताप फक्त माणसांनाच होतो असं नाही. प्राण्यांना देखील याचा संताप होतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्ती आपल्या पिल्लांसह रस्ता ओलांडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काही वाहने हत्तींजवळून जातात. अशा परिस्थितीत, हत्ती त्याच्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्टिव मोडमध्ये येतात. जेव्हा त्यांची पिल्ले धोक्यात आहेत असं वाटतं तेव्हा हत्तीने कारवर हल्ला केला.
आणखी वाचा : एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे
ही क्लिप २८ सेकंदांची आहे ज्यात जंगलाच्या मधोमध एक रस्ता जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. हत्तींचा एक छोटा कळप रस्ता ओलांडण्यासाठी पुढे जातो. काही लोक दुरूनच वाहने थांबवून हत्ती जाण्याची वाट पाहतात. काही मूर्ख लोक त्यांच्या इतके जवळ जातात की हत्ती त्यांच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी पांढऱ्या रंगाच्या गाडीवर हल्ला करतात. त्या कार चालकाचं नशीब चांगलं होतं म्हणून हल्ला करणारे हे हत्ती तिथून निघून जातात.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात दिवंगत वडिलांचा जिवंत भासणारा पुतळा पाहून नवरीला अश्रू अनावर, सारेच जण भावूक
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.