तीन तासांत फक्त ४० हजार पर्यटकांनाच पाहता येणार ताजमहाल

भारतीय पर्यटकांसाठी नवा नियम

ताजमहाल (संग्रहित छायाचित्र)

‘ताजमहाल’ ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना फक्त ३ तासांचा अवधी मिळणार आहे. या तीन तासांत केवळ ४० हजार पर्यटकांनाच ताजमहाल पाहता येणार आहे, २० जानेवारीपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. त्यामुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी ताजमहाल हादेखील एक आहे. येथे होणारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे दरदिवशी फक्त ४० हजार भारतीय पर्यटकच ताजमहालला भेट देऊ शकतात. विदेशी पर्यटकांसाठी मात्र हा नियम लागू करण्यात आलेला नाही.

काही सुत्रांच्या माहितीनुसार ४० हजार पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ४० हजारांची संख्या पार केल्यानंतर ज्या पर्यटकांना ताजमहल पाहायचा असेल त्यांना तिकिटीसाठी १ हजार रुपये मोजावे लागणार आहे. सुट्ट्यांच्या काळात ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या ही दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या घरात असते, त्यामुळे सुरक्षेच्या कारण्यास्तव ही मर्यादा घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Only 40000 visitors to be allowed per day in taj mahal

ताज्या बातम्या