आजकाल, सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चित्रांना खूप मागणी आहे, कारण विचित्र आणि गोंधळात टाकणारी चित्रे पाहिल्यानंतर लोकांना त्यातील कोडी सोडवण्यात मजा येऊ लागली आहे. जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात हे तुम्हाला माहीत आहेच, पण घनदाट भागात त्यांना सहजासहजी शोधणे सोपे नसते. अनेक वन्यजीव छायाचित्रकार जंगलात फिरतात आणि अशी छायाचित्रे क्लिक करण्यासाठी सतर्क असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या चित्रात लपलेला सरडा फक्त एक टक्का लोकांनाच दिसत असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक तपकिरी झाडाची फांदी दिसत आहे, ज्यावर एक लहान सरडा तुमच्या डोळ्यांसमोर आहे, परंतु कोणालाही सहज दिसत नाही. हे गोंधळात टाकणारे चित्र पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले, कारण त्यापैकी बहुतेकांना सरडा सापडला नाही. युजर्सनी बराच वेळ प्रयत्न केला, परंतु सरडा शोधण्यात ते अयशस्वी झाले.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हालाही अजूनपर्यंत चित्रात सरडा दिसला नसेल, तर आम्ही तुम्हाला काही सूचना देत आहोत जे तुम्हाला मदत करू शकतात. फांदीवरील वाढलेल्या राखाडी भागाकडे काळजीपूर्वक पहा आणि सरड्याचे डोळे पाहण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला त्याचे डोके आणि पाय देखील ओळखण्यास मदत करेल.

हे गोंधळात टाकणारे चित्र सर्वात कठीण कोडे आहे कारण सरडा जरी आपल्या डोळ्यांसमोर असला तरी तो आपल्याला सहज सापडत नाही.