Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ किंवा फोटो थक्क करणारे असतात. ऑप्टिकल इल्यूजन हा व्यक्तीची बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे, अशक्य असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत एक तरुणी रस्त्यावर बसलेली दिसत आहे पण ही तरुणी खरंच रस्त्यावर बसलेली आहे की केवळ एक भास आहे, हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी भर रस्त्यावर बसलेली दिसत आहे.गुलाबी रंगाचा वनपीस आणि सँडल घालून ही तरुणी हटके अंदाजात रस्त्यावर बसलेली दिसत आहे. पण रस्त्यावर बसलेली ही खरंच तरुणी आहे का? आणि ती खरंच रस्त्यावर बसलेली आहे का? की तुमचा हा भास आहे? चला तर जाणून घेऊ या.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला कळेल की खरंच रस्त्यावर तरुणी बसलेली आहे की नाही. या व्हिडीओत एक तरुण रस्त्यावर चक्क तरुणीचं चित्र काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. रस्त्यावर बसलेली ही तरुणी नसून हे एक रस्त्यावर काढलेलं सुंदर थ्री डी चित्र आहे. या तरुणाची ही कला पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे थ्री डी चित्र पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा : VIDEO : अस्सल मराठी सौंदर्य! तरुणीने सादर केली लावणी, नाशिकचा व्हिडीओ होतोय व्हायरल
road_art1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रस्त्यावर काढलेलं खूप सुंदर थ्रीडी आर्ट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर कला आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” अनेक युजर्सनी या चित्रकारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.