Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवायला अवघड जातात. ऑप्टिकल इल्यूजन ही आपली बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. अनेकांना ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवायला आवडतात. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या पोस्ट बघितल्या असतील. सध्या अशीच एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये नेमके कशाचे चित्र आहे? हे आपल्याला शोधून काढायचे आहे. त्यासाठी हा व्हायरल फोटो नीट पाहा.

व्हायरल पोस्ट

या पोस्टमध्ये तुम्हाला सुरुवातीला ओठांचे चित्र काढलेला फोटो दिसेल पण जेव्हा तुम्ही फोटोकडे नीट पाहाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की हा ओठांचा फोटो नाही तर एक खाली पडलेल पान आहे. या पानाचे रंग रुप पाहून कोणीही थक्क होईल कारण हे ओठांसारखेच दिसते. या पानाचा रंग लाल असून याचा आकार हुबेहूब एखाद्या ओठाप्रमाणे आहे. तुम्ही जर सुरुवातीला बघाल तर तुम्हाला वाटेल की हे ओठ आहेत पण नीट पाहिल्यावर हे पानाचे चित्र असल्याचे कळून येईल.
सध्या हा थक्क करणारा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो पाहिले असेल पण हा फोटो सर्वात हटके आहे. सध्या फोटोची सगळीकडे चांगलीच चर्चा सुरू आहे.Optical Illusions या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : IIT मध्ये प्रवेश करण्याचे आहे स्वप्न ? मग अशा पद्धतीने करा तयारी; आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केल्या टिप्स

सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होतात. काही फोटो दुरून खूप वेगळे दिसतात पण जवळून नीट बघितले तर वेगळे फोटो दिसतात. या व्हायरल फोटोमध्ये तु्म्हाला असेच काही दिसेल. काही लोकं हा फोटो पाहून अवाक् होईल तर काही लोकांना हे हटके ऑप्टिकल इल्यूजन खूप आवडेल.