Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन हा आपली बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ असतो. ही एक प्रकारची बुद्धिमत्ता चाचणी असते, पझल, , आकड्यांचा खेळ, क्विझ सोडवून आपल्याला योग्य उत्तर शोधावे लागतात. खरं तर ऑप्टीकल इल्यूजन हा आपल्या मेंदूला आव्हान देण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे आपल्या पाहण्याची क्षमता तपासली जाते पण त्याबरोबर विचार आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेलाही एक नवीन आव्हान मिळते. काही ऑप्टिकल इल्यूजन खूप सोपे असतात तर काही ऑप्टिकल इल्यूजन खूप कठीण असतात.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कॉल डाएल करतानाचा किवर्ड दिसेल ज्यावर आकडे लिहिलेले. काही आकडे टाइप केलेले आहे. या फोटोमध्ये नेमके किती ३ तुम्हाला दिसतात, हे शोधून काढायचे आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल फोटो एका फोनचा स्क्रिनशॉट आहे. यामध्ये तुम्हाला डाएल पॅड दिसून येईल. त्यावर काही आकडे टाईप केले आहेत. तर काही किपॅडवर 0 ते ९ पर्यंत आकडे दिसत आहे. या फोटोवर लिहिलेय, “येथे किती ३ दिसत आहे?” हे इल्यूजन आहे, जे आपल्याला सोडवायचे आहे.
तुम्हाला या फोटोमध्ये किती वेळा ३ हा आकडा दिसलाय?
व्हायरल फोटो (Viral Photo )
या फोटोमध्ये किती वेळा ३ हा आकडा दिसत आहे?
फोनच्या स्क्रिनशॉटचा हा फोटो आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला स्क्रिनवर ३.३३ PM असा वेळ लिहिलेला दिसेल. त्यात तीन वेळा ३ आले आहे. त्यानंतर स्क्रिनच्या उजव्या बाजूला ३३ टक्के बॅटरी असल्याचे दिसतेय. तिथे दोन वेळा तीन दिसेल. त्यानंतर खाली टाइप केलेले काही आकडे दिसतील. ‘313433535333’ या आकड्यांमध्येल एकुण आठ वेळा ३ लिहिलेले दिसत आहे. या आकड्यांच्या खाली ‘Ang3lica 3nriqu3z’ असे नाव लिहिलेले दिसत आहे. या नावामध्ये ३ वेळा ३ हा आकडा आलेला दिसत आहे. खाली तुम्हाला किपॅड दिसेल त्यात दोन वेळा ३ हा नंबर दिसत आहे. असे ऐकून संपूर्ण फोटोमध्ये १८ वेळा ३ हा आकडा दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही या ऑप्टिकल इल्यूजनला सोडवू शकता.