निरोगी शरीरासाठी नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. अगदी त्याच प्रकारे जर आपल्या मेंदूलाही व्यायामाची गरज असते, आपली बुद्धी तल्लख करायची असेल तर मेंदूचा व्यायाम करणं गरजेचं आहे. अन् यासाठी विविध प्रकारची कोडी तुम्हाला मदत करू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक गंमतीशीर कोडं घेऊन आलो आहोत. तुम्हाला या फोटोमध्ये केवळ एक मुंगी शोधायची आहे. अनेक हुशार मंडळींनी प्रयत्न केले. पण अद्याप ही मुंगी कोणालाही सापडलेली नाही. चला तर मग पाहूया तुम्हाला या फोटोमध्ये कुठे मुंगी दिसते का?

ऑप्टिकल इल्युजनचे असेच चित्र समोर आले आहे ज्यामध्ये एक मुंगी गोड ब्लूबेरी फळाच्या मधोमध बसलेली आहे. मुंगीचा रंग आणि ब्लूबेरीचा रंग सारखाच दिसत असल्याने कदाचित त्यामुळेच मुंगी लगेच दिसत नाही. या फोटोसाठी सोशल मीडिया युजर्सना १० सेकंदाचं चॅलेंज देण्यात आलं आहे. एवढ्या वेळात जर तुम्हाला ही मुंगी सापडली तर तुम्हाला खरोखरच जीनियस म्हटलं जाईल. एक गोष्ट म्हणजे हे चित्र जितकं सोपं दिसतं, तितकंच त्यातली मुंगी शोधणंही अवघड आहे. चला तर मग आता बघा तुम्हाला हे जमतंय का.

हे चॅलेंज तुम्ही स्विकारणार का?

हेही वाचा – Optical Illusion: तुम्हाला आधी कावळा दिसला की माणसाचा चेहरा? तुमचं उत्तर, तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हे कोडं व्हायरल होत असून आता हा फोटो तुम्ही आपल्या मित्र-मंडळींना देखील पाठवा आणि पाहा त्यांना उत्तर शोधता येतंय का?