Viral Video : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांबरोबर एक बैठक घेत महत्वाचे आदेश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ ड्युटीवर हजर व्हावं लागणार आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुट्टी रद्द झाल्यानंतर तो कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर निघाला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सुट्टी रद्द झाल्यानंतर सीमेवर निघाला जवान
या जवानाचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहे. एका व्हिडीओमध्ये या जवानाचा मुलगा त्याला जाऊ नको असं म्हणतो तेव्हा
‘मला जावं लागेल बेटा’ असं सांगत जवान समजूत काढताना दिसतो.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बॅग पॅकिंग करून सोफ्यावर जवान बसलेला आहे आणि त्याची आई त्याचे औक्षण करत आहे. त्यानंतर तो स्टेशनवर जाताना दिसतो आणि ट्रेन पकडून जाताना दिसतो. शेवटी सर्वांचा निरोप घेतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
prasad_dargude7788 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारत पाकिस्तान सीमेवर माहोल गरम असल्यामुळे फौजीच्या सुट्ट्या रद्द करून परत बोलावून घेतले.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही पण तुमच्या सोबत आहेत भाऊ वेळ आली तर आम्ही तयार आहोत” तर एका युजरने लिहिलेय, “इंडियन आर्मीवर मला अभिमान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “काळजावर दगड ठेवून जावं लागतं” अनेक युजर्सनी जवानाला काळजी घेण्यास सांगितले. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी ७ मे रोजीच्या मध्यरात्री हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जगभरातून कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर लोक जवानांवर प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव करत आहे.