Pahalgam Terror Attack Fact Check : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरनमध्ये बुधवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात जवळपास २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यात लाईटहाऊस जर्नलिझमला नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ आढळून आला. काही युजर्स असाही दावा करीत आहेत की, पूंछच्या टाटापाणी भागात गोळीबार झाला. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर्स पार्थ आयएएसने २३ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या प्रोफाइलवर व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
यावेळी व्हायरल व्हिडीओ InVid टूलवर अपलोड केला आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही आमचा तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला २०२१ मध्ये फेसबुकवर पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओ आढळला, ज्यावरून तो जुना होता आणि अलीकडचा नव्हता याची पुष्टी झाली.
आम्हाला १५ एप्रिल २०२० रोजी IAF Garud नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केलेला एक व्हिडीओ आढळला.
त्याशिवाय रिपब्लिक भारतच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओदेखील आढळला; परंतु त्याचा अँगल वेगळा होता.
आम्हाला घटनेबद्दल एक बातमीदेखील आढळली.
निष्कर्ष :
पूंछमधील टाटापाणी येथील नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचा व्हिडीओ अलीकडील असल्याचा दावा करीत व्हायरल केला जात आहे. दरम्यान, हा व्हिडीओ २०२० चा आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.