Pakistan Electricity Crisis: पाकिस्तानमध्ये सोमवारी, २३ जानेवारीला वीजपुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये बिघाड होत ११७ ग्रीड ठप्प झाले होते. यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर, कराची या प्रमुख शहरांसह जवळपास संपुर्ण पाकिस्तानमधील वीजपुरवठा खंडीत झाला. ANI ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील ९० टक्के आर्थिक केंद्रांना याचा फटका बसला आहे, या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. वीज नसल्याने खास करुन मुख्य शहरातील दैनंदिन व्यवहारही हे ठप्प झाले आहेत. अशातच आता एक वेगळाच व्हायरल फोटो चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@YanaMir या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये पृथ्वीचे दृश्य दिसत आहे. यामध्ये सर्व देश लाईट्सने उजळून स्पष्ट दिसत आहेत. पण पाकिस्तानात वीज खंडित झाल्याने पाकिस्तान काळोखात दिसत आहे. यामुळेच पाकिस्तान पृथ्वीवरून गायब झाला आहे असे कॅप्शन याना यांनी लिहिले आहे. याशिवाय पुढे त्या म्हणतात, “जर एका विशिष्ट समुदायाने “आझाद” होण्याचा हट्ट केला नसता तर त्यांची जमीन भारताच्या तेजस्वी नूर (प्रकाशात) पाहता आली असती”

पृथ्वीवरून पाकिस्तान झाला गायब?

दरम्यान हा फोटो जरी खोटा असला तरी पाकिस्तानातील वीज समस्या तितकीच खरी आहे. पाकिस्तान सरकारने संध्याकाळ नंतर वीजच्या वापरांवर मोठे निर्बंध घातले आहेत. विशेषतः रात्री १० च्या आतच लग्न समारंभ कार्यक्रम पूर्ण करावे , सर्व कार्यालये ही सूर्यास्तानंतर सुरु रहाणार नाहीत अशा अनेक वीज बचतीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत.सुमारे १३ हजार मेगावॅट पेक्षा जास्त वीजेची मागणी पाकिस्तानमध्ये असतांना सध्या जेमजेम नऊ हजार मेगावॅट ही उपलब्ध होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan disappeared from earth due to electricity crisis complete dark photo goes viral pakistani says azadi ki zidd svs
First published on: 26-01-2023 at 10:23 IST