पाकिस्तानात कधी काय होईल याचा काही नेम नाही. पाकिस्तानमध्ये एखादी घटना घडली आणि सोशल मीडियावर त्यावर चर्चा झाली नाही, असं कधीच होत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाकिस्तान देश चर्चेत येत असतो. सध्या पाकिस्तान नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आलाय या व्हिडीओमध्ये चक्क विद्यार्थ्यांसमोर अश्लिल डान्स सादर करण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागलाय. या व्हायरल व्हिडीओनंतर मात्र पाकिस्तान युनिर्व्हसिटीला एक नोटिस देण्यात जारी करण्यात आलीय. काय आहे नक्की प्रकरण जाणून घ्या…

पाकिस्तानमध्ये एका महिला गायिकेचा परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. पेशावरमधील एका खासगी विद्यापीठात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला गायिका गाण्यासोबतच डान्स करताना सुद्धा दिसत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स फार अश्लिल पद्धतीच्या दिसून येत आहेत. एका खासगी विद्यापीठातील महिला गायिका पाश्चात्य कपड्यांमध्ये बोल्ड डान्स मूव्हसह गाणे गात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. गाण्यासोबत तिने केलेला हा डान्स अश्लिल असल्याचा आरोप आता इथल्या कट्टरपंथीयांनी केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच याविरोधात आवाज उठू लागला आहे. कट्टरपंथीयांनी त्याला ‘आक्षेपार्ह’ म्हटलंय.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

काही पाकिस्तानी युजर्स सोशल मीडियावर महिलेच्या परफॉर्मन्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या व्हिडीओमध्ये ती महिला पाश्चात्य कपड्यांमध्ये दिसत आहे. गायिकेचे कपडे आणि डान्स पाहून नेटकरी संतापले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कुलपतींना लवकरच काढून टाकले जाईल. केपी, एनसीएस विद्यापीठ पेशावरमध्ये हे खपवून घेतले जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी या व्हिडीओची दखल घेत खैबर मेडिकल युनिव्हर्सिटीने ही घटना घडलेल्या खासगी विद्यापीठाला नोटीस बजावली आहे आणि त्याचा जबाब मागवला आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘केएमयूचा लोगो आणि नाव असलेल्या व्यासपीठावर असे कृत्य करणे आक्षेपार्ह आहे. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार, खैबर मेडिकल युनिव्हर्सिटीने आपल्या नोटीसमध्ये या खासगी विद्यापीठाला तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. प्रतिसाद न दिल्याने कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.