Wasim Akram Viral Photo Controversy: पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. मॅच संदर्भातील विश्लेषण करणे असो किंवा स्वतःचे फोटो पोस्ट करणे असो वसीमच्या इंस्टाग्राम पोस्ट सातत्याने समोर येत असतात. यावर लोकांनी केलेल्या कमेंट्सवर अक्रम सुद्धा कधी मजेशीर शैलीत तर कधी खरमरीत शब्दात उत्तर देतो. आता सुद्धा एक अशीच पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये एका चाहत्याने वसीम अक्रम याच्या फोटोवर उगाचच खोडकर कमेंट करत पंगा घेण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अक्रमने दिलेला धोबीपछाड आता व्हायरल होत आहे.

तर झालं असं की, वसीम अक्रम याने सिडनी येथील एका सुंदर सकाळचा फोटो कॅप्शनसह पोस्ट केला होता. यावर एका फॉलोवरने कमेंट करत म्हटले की, “तुझ्या काखेतील केस आधी कापून ये” हे वाचून अक्रमचा पारा चढला आणि मग त्याने कमेंटला उत्तर देत एकासह सगळ्यात ट्रोलर्सची शाळा घेतली. अक्रमने कमेंटवर उत्तर देत लिहिले की, “तिथे जग चंद्रावर पोहोचलं आहे आणि माझ्या देशातील काही मुर्खांना मात्र अजूनही काखेतील केसाची पर्वा आहे. यावरून हेच दिसून येतं की आपण अजूनही नेमकं कुठे आहोत, आपली संस्कृती किती खराब आहे, खरंच यावर विश्वासच ठेवता येत नाही.”

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या समालोचनासाठी वसीम अक्रम सिडनी येथे आहेत. यापूर्वी भारतात झालेल्या विश्वचषकाच्या वेळी पाकिस्तानचा खेळ पाहूनही अनेकदा वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी संघावर, व्यवस्थापनावर टीका केली होती.

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने महाराष्ट्राचा ‘हा’ समुद्रकिनारा दाखवत मालदीव vs लक्षद्वीप वादात सर्वांना केलं थक्क; म्हणाला, “आमचं..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसीम अक्रमचं क्रिकेटमधील योगदान

माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम पाकिस्तानच्या संघातील एक हुकुमी एक्का होता. ३५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३.५२ च्या सरासरीने त्याने ५०२ विकेट्स घेतल्या होत्या. एका सामन्यात तर अवघ्या १५ धावा देत पाच विकेट घेण्याचा विक्रम अक्रमने केला होता. अक्रमने सहा वेळा एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये वसीमने ४१४ विकेट्स घेतल्या होत्या.