पाकिस्तानी तरुणींच्या डान्स व्हिडीओजने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मेरा दिल ये पुकारे गाण्यावरचा पाकिस्तानमधील एका तरुणीने केलेला डान्स चर्चेत असतानाच आता दुसऱ्या एका व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. डीजेवर ‘लैला मै लैला’ गाणं सुरु होताच या तरुणीने भन्नाट डान्स करुन प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं. ऑफ-व्हाईट कलरचा गाऊन घालून या तरुणीने डान्स जादुई कला प्रेक्षकांसमोर सादर केली. लैला मै लैला गाण्यावर एकाहून एक जबरदस्त ठुमके लगावत तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी तरुणीचा हा डान्स व्हिडीओ वाऱ्याच्या वेगासारखा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. ज्या लोकांना मनोरंजन क्षेत्राची प्रचंड आवड आहे, त्यांच्यासाठी या व्हिडीओच्या माध्यमातून मनोरंजनाची एकप्रकारे मेजवानीच मिळाल्यासारखं आहे. तिच्या मोहक अदा आणि गाण्यावर डान्स करण्याची अप्रतिम शैली पाहून लाखो नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. या गाण्याचे बोल इतके अप्रतिम आहेत, की तुम्हालाही या गाण्यावर डान्स करण्याची इच्छा नक्की होईल.

नक्की वाचा – Video: समुद्रात आनंदाश्रू तरळले! पोहता पोहता तो मासा जवळ आला अन् मिठीच मारली, नेमकं काय घडलं?

इथे पाहा व्हिडीओ

पाकिस्तानच्या आयशाचे जबरदस्त डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. पण या तरुणीचा डान्स व्हिडीओही दिवसेंदिवस गाजत असल्याचं दिसत आहे. बॉलिवडूचं गाणं लैला मै लैया यापूर्वीच लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेलं आहे. त्यामुळे या गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीलाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेली आयशा तिच्या अप्रतिम डान्समुळं जगभरात गाजली आहे. पण तिच्या डान्सला टक्कर देणाऱ्या लैला मै लैला गाण्याचा दसुऱ्या पाकिस्तानी तरुणीच्या व्हिडीओकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.