एका पाकिस्तानी पत्रकाराचे तालिबानी प्रेमही समोर आले आहे. या पत्रकाराने इम्रान खानच्या दोन पावले पुढे जाऊन ऑन कॅमेरा तालिबान प्रवक्त्याला फ्लाइंग किस दिला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तालिबानच्या प्रवक्त्याला म्हटले धन्यवाद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी पत्रकार जमाल फारुकी तालिबान सरकारचे प्रवक्ते सुलेह शाहीन यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये फारुकी जमील तालिबानच्या प्रवक्त्याला ‘धन्यवाद शाहीन भाई’ म्हणताना ऐकू येत आहेत. यानंतर ते तालिबानच्या प्रवक्त्याला फ्लाइंग किस देतात आणि त्या बदल्यात त्यांनाही फ्लाइंग किस मिळतो.
( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )
अफगाणिस्तानला जाण्याची इच्छा केली व्यक्त
व्हायरल व्हिडीओच्या शेवटी जमाल फारुकी यांनी अफगाणिस्तानला जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ‘शाहीन भाई तुम्हाला तुमच्या भावाला अफगाणिस्तानात बोलवावे लागेल’, असे तो म्हणताना ऐकू येतो. फ्री व्हिसावर कॉल करावा लागेल. हे ऐकून तालिबानच्या प्रवक्त्याच्या चेहऱ्यावर हसू उमलते. फारुकी सुलेह शाहीनला सांगतात की तालिबान सरकारच्या यशाबद्दल सांगण्यासाठी त्याला अफगाणिस्तानात यायचे आहे. व्हिडीओमध्ये दोघेही जणू दीर्घकाळचे मित्र असल्याचे दिसत आहे.
( हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांमध्ये असतो पैसे कमविण्याचा जास्त ध्यास, करिअरमध्येही मिळते लवकर यश)
( हे ही वाचा: शशी थरूर यांनी मिस युनिव्हर्स हरनाजसोबतचा फोटो पोस्ट करताच नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया)
जगाकडून तालिबानला मान्यता नाहीच
पाकिस्तान जगात एकमेव असा देश आहे जो खुलेपणाने तालिबानचे स्वागत करतो. बाकी देश तालिबानला दहशतवादी संघटनेच्या रुपातच ओळखतात. इमरान खानच्या अनेक प्रयत्नांनंतरही तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकली नाही. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू केला आहे. यामुळे तेथील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.