तुम्हाला ती सुंदर पाकिस्तानी मुलगी आठवत असेल, जिचा रोटी बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रोटी बनवतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लागोपाठ तिचे नव नवे व्हिडीओ सोशड मीडियावर धडकू लागले आणि त्याला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंदी देखील मिळाली. तिच्या व्हिडीओमधील दिलखेचक स्माईलने तर सारेच जण घायाळ आहेत. आता तिच्या चेहऱ्यावर कातिलाना स्माईल घेऊन भाजी बनवतानाचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यापूर्वीप्रमाणेच हा नवा व्हिडीओ सुद्धा लोकांना खूपच आवडलाय. याआधी, तिचे कपडे धुताना आणि घरातील कामे करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. तिचे सुंदर डोळे पाहून लोकांना तर भुरळ पडली आहे.

आता व्हायरल होत असलेल्या नव्या व्हिडीओमध्ये, मुलगी तपकिरी कुर्ता, काळ्या रंगाचा सलवार आणि दुपट्टा परिधान केलेली दिसत आहे. भाजी शिजवताना ती तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल देताना दिसून येत आहे. घराच्या एका कोपऱ्यात बसून शेगडीवर एका मोठ्या वाडग्यात सतत भाजी करत आहे.

आणखी वाचा : VIRAL : झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडल्या आणि फोन अनलॉक करून १८ लाखांचा चूना लावला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Firing In Marraige : लग्नात नवरदेवाने नवरीचा हात पकडत हवेत केली फायरिंग; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही तपकिरी डोळ्यांची तरूणी पाकिस्तानची रहिवासी आहे आणि तिचं नाव अमिना रियाज असं आहे. ती पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराचीच्या बाहेरील भागात राहते. मात्र, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणारी आमिना नाही. त्याच्या शेजारच्या एका मुलाने तिचे हे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक या तरूणीची जोरदार प्रशंसा करत आहेत.