जगभरात लोकप्रिय ठरलेली मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरच्या सीईओपदी भारताचे पराग अग्रवाल नियुक्त झाले आणि नेटिझन्सनी त्यांना डोक्यावर घेतलं. पराग अग्रवाल यांच्याबाबतच्या अनेक गोष्टी त्यापाठोपाठ व्हायरल होऊ लागल्या आहेत. मग तो त्यांचा पगार असो किंवा त्यांच्या आवडी-निवडी. पण या सगळ्यामध्ये सर्वात जास्त व्हायरल होत आहे ते त्यांनी १० वर्षांपूर्वी केलेली ट्वीट. २०११ मध्ये जेव्हा पराग अग्रवाल ट्विटमध्ये रुजू झाले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यासोबत एक मेसेज पोस्ट केला होता. हीच इन्स्टाग्राम पोस्ट त्यांनी नंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या पोस्टमध्ये?

पराग अग्रवाल यांनी १० वर्षांपूर्वी म्हणजेच ४ ऑक्टोबर २०११ रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधून हे ट्वीट केलं होतं. ट्विटर कंपनी जॉईन केल्यानंतर त्यांनी हे ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची लिंक शेअर केली आहे. त्याच्या वर “असं वाटतंय की मला या जॉबवर काम करताना मजा येणार आहे”, असा मेसेज देखील केला आहे.

पराग अग्रवाल यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एक पेयाची बॉटल आणि खाली “वेलकम पराग!” असं लिहिलेला संदेश आहे. हा फोटो पराग अग्रवाल यांच्या वर्क डेस्कवरचा असल्याचं सांगितलं जात आहे.

ट्वीटरमध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलांमध्ये कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर पराग अग्रवाल यांना सीईओपदी नियुक्त करण्यात आलं आहे. २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात पराग अग्रवाल पदभार स्वीकारतील. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parag agrawal twitter ceo 10 years old tweet viral says welcome parag pmw
First published on: 30-11-2021 at 18:44 IST