‘पेटीएम’ Paytm आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ पेट्रोल आणि डिझेलवरच्या खरेदीवर ग्राहकांना ५० ट्क्के कॅशबॅक देणार आहे. या सवलतीचा फायदा हिंदुस्तान पेट्रोलियमच्या कोणत्याही पेट्रोल, डिझेल पंपावर घेता येणार आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पेटीएमद्वारे पैसे भरणं अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी किमान ३०० रुपयांचं इंधन भरणंही गरजेचं असणार आहे. इंधन भरल्यानंतर प्रत्येक आठवड्याला लकी ड्राद्वारे तीन विजेत्यांची नावं घोषीत केली जाणार आहे. जे तीन विजेते असतील त्यांना ५० % टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या विजेत्यांच्या खात्यात ३०० रुपयांपैकी १५० रुपये जमा करण्यात येणार आहेत. २८ डिसेंबरपर्यंत या सवलीचा लाभ ग्राहकांना उठवता येणार आहे.

३५ वर्षांनंतर ‘या’ देशानं उठवली चित्रपटांवरील बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video : हत्तीचा प्रवासी बसवर हल्ला, गाडीत अडकलेल्या चालकाची अखेर सुटका

त्याचप्रमाणे प्रत्येक ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅकही मिळणार आहे. अर्थात पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमची ही सवलत फक्त बिहार राज्यापुरतीच मर्यादित आहे.