Todays Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण जवान चित्रपट पाहिल्यानंतर काही लोकांनी चित्रपटगृहात रिफंडची मागणी केलीय. अशातच एक सवाल उपस्थित झालाय की, जर चित्रपट चांगला आहे, तर लोकांनी तिकिटाचे पैसे परत का मागितले? यामागचं कारण जाणून घेण्यासाठी व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा नक्कीच पाहा.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटाचं रिफंड मागण्याचं कारण स्पष्ट झालं आहे. चित्रपटगृहात फिल्मचा पहिला भाग दाखवण्याऐवजी दुसरा भाग प्ले करण्यात आला होता. लोकांना याबाबत समजल्यावर धक्काच बसला. त्यानंतर लोकांनी मॅनेजमेंटकडे जाऊन रिफंडची मागणी केली. सहर राशिद नावाच्या यूजरने या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नक्की वाचा – क्रिकेटच्या पहिल्या समालोचनासाठी हर्षा भोगलेंना किती मानधन मिळालं? ४० वर्षांपूर्वीची ‘Payslip’ केली शेअर, म्हणाले…

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजतं की, चित्रपटाचा शो १ तास १० मिनिटांतच संपला. व्हिडीओत एका व्यक्तीने म्हटलं की, स्क्रीनवर इंटरवलचा चिन्ह दाखवल्यावर लोक गोंधळात पडले. लोकांना कळतच नव्हतं की, असं का होत आहे. लोकांनी काही वेळानंतर समजलं की, चित्रपटागृहाच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळे असं घडलं आहे. त्यामुळे लोकांनी मॅनेजमेंटकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. सहरने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, माझ्या आयुष्यात अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडली. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.