एखाद्या वस्तूवर घसघशीत सवलत असेल तर त्यावर ग्राहक कसे तुटून पडतात हे काही आपल्याला नवं नाही. ‘सेल’ हा एक शब्द ग्राहकांची गर्दी ओढून घेण्यास पुरेसा असतो. तेव्हा सेल लागला रे लागला की ग्राहकांची तुडुंब गर्दी मॉल, दुकानात पाहायला मिळते. पण कधी एखाद्या पदार्थावर घसघशीत सुट जाहीर केल्यावर ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचं तुम्ही पाहिलं आहेत का? मग फ्रान्समधला हा व्हिडिओ पाहा. फ्रान्ससारख्या सधन देशातही नटेलावर ७० टक्के सूट मिळणार असल्याचं कळताच अगदी ग्राहकांनी झुंबड उडाली.
लोक अक्षरश: मॉलमधल्या नटेलाच्या बॉक्सवर तुटून पडले. काहींनी तर धक्काबुक्की, हाणामारी केली. गोंधळ वाढल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मग पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली. पाश्चिमात्य देशांत नटेला हे स्प्रेड सर्वात आवडता पदार्थ म्हणून गणला जातो. याचा खपही सर्वाधिक आहे. हे काही फ्रान्समध्ये पहिल्यांदाच घडलं असं नाही यापूर्वीही नटेलावर सूट जाहीर करताच ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त नटेला मिळवण्यासाठी हाणामारी झाली होती.
https://twitter.com/BNONews/status/956748327722221568
Le #Nutella rend fou