Viral Video : २५ मार्च २०२४ रोजी देशात सर्वत्र होळी साजरी करण्यात आली. रंगाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सगळीकडे लोक एकमेकांना रंग लावताना आणि मजा मस्ती करताना दिसले. होळी खेळतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्हाला माहिती आहे का काही लोकांनी या होळीच्या नावावर वाहतूक नियम सुद्धा मोडले.सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

होळीच्या दिवशी लोकांनी तोडले वाहतूक नियम

RCB fans abuse CSK fans video viral
RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल
Delhi fashion influencer Nancy Tyagi
२० किलोच्या गुलाबी गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी नॅन्सी आहे तरी कोण? पाहा व्हायरल फोटो
boy and girl fight in stadium Video viral
स्टेडियममध्ये प्रेक्षकांची तुंबळ हाणामारी, स्टँडमध्ये बसलेल्या मुलीने समोरच्याला कानशिलात लगावली अन्… VIDEO होतोय व्हायरल
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
KKR Fan tried to steal ball video viral
KKR च्या चाहत्याने स्टेडियममध्ये बॉल चोरण्यासाठी केले अश्लील कृत्य, पँटमध्ये हात घातला अन्…; पोलिसांनी धक्के मारत काढले बाहेर, VIDEO व्हायरल
Video: Canara, Bandhan Bank Officers Abuse Staff Over Targets
“अरे खड्ड्यात गेलं तुमचं कुटुंब” टार्गेट पूर्ण न केल्यानं बँक मॅनेजरची शिवीगाळ; मिटींगचा VIDEO झाला व्हायरल अन्…
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
Indonesian volcano erupts for second time viral video
बापरे! पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक! Video मधील दृश्य पाहून तुमच्याही छातीत भरेल धडकी!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक वाहतूक नियम मोडताना दिसले. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका दुचाकीवर एक, दोन नाही तर तीन लोक बसलेली आहेत. विशेष म्हणजे या पैकी कोणीही हेल्मेट घातलेले नाही. एवढंच नाही तर व्हिडीओत पुढे यांच्यापेक्षा पण मोठा ग्रुप वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतो. व्हिडीओत तुम्हाला एक लाल रंगाची कार दिसेल ज्यामध्ये ९ लोक प्रवास करताना दिसत आहे. त्यातला एक व्यक्ती गाडीच्या बोनेटवर बसला आहे. व्हिडीओमध्ये या गाडीची नंबरप्लेट सुद्धा दिसत आहे यावरून कळते की हा व्हिडीओ राजस्थानचा आहे

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : १० सेकंदात काढा होळीचा रंग; तरुणाने शोधला अनोखा जुगाड, VIDEO होतोय व्हायरल

या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की यावर राजस्थान पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आणि जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करण्यास सांगितले. त्यावर जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलेय, “तुमची तक्रार आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या बाबत तुम्हाला वेळ, दिनांक आणि जागेविषयी माहिती मिळाली तर जयपूर पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांक ८७६४८६६९७२ वर पाठवा.”
indian_armada या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बिघडलेल्या वडिलांचे श्रीमंत मुले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिघडलेले दिसत आहे. श्रीमंत तर दिसत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खूप धक्कादायक आहे”