आजची पिढी इतकी फास्टफॉरवर्ड आणि हूशार आहे की, त्यांच्या एखादी गोष्टी शिकवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, असं अनेकांना बोलताना तुम्ही ऐकलं असेल. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. इतक्या लहान वयात मुलीने केलेली स्नोबोर्डिंग पाहून सारेच जण प्रेरित होत आहेत. इवल्याश्या चिमुकलीने केलेली परफेक्ट स्नोबोर्डिंग पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. बरीच वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतरही अनेकांना इतकी परफेक्ट स्नोबोर्डिंग जमत नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक पटाईत खेळाडू सुद्धा लाजल्याशिवाय राहणार नाही.

फक्त स्वतःसाठी हा व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दिसणारी मुलगी अवघ्या चार वर्षाची आहे. काय? चार वर्षांची चिमुकली कसं काय स्नो बोर्डिंग करून शकते? असंच तुम्ही म्हणाल. साहजिकच तुमचा काय कुणाचाच यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जगात टॅलेंटेड लहान मुलांची कमी नाही. अगदी कमीत कमी वयात मुलांकडे असं टॅलेंट असतं की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मोठी माणसंही जे करू शकत नाही, मोठ्या माणसांनाही जे अशक्य किंवा कठीण वाटतं असं ही मुलं सहजपणे करताना दिसतात. त्यापैकीच एक आहे ही अवघ्या चार वर्षांची चिमुकली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन् करावी लागली इमर्जन्सी लॅंडिंग

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डायनॉसरचे कपडे परिधान केलेल्या या इवल्याश्या चिमुकलीचं नाव ऑब्रिन सेज असं आहे. आपल्या इवल्या इवल्याश्या पायांवर उभं राहून स्नोबोर्डिंग करताना दिसून येत आहे. वॉशिंग्टनमधल्या याकिमा इथे राहणारे रॉबर्ट गार्लो यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. माउंट रेनियर नॅशनल पार्कच्या दक्षिण-पूर्व मधल्या एका बर्फाळ वंडरलॅंडचा आनंद घेताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : ‘Badhaai Do’ गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नातेच उठले जीवावर, संपत्तीच्या वादावरून भर रस्त्यात दोन कुटुंबांमध्ये लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी हाणामारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६६ हजारांपेक्षा लाईक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर कमेंट करत लोकांनी इतक्या लहान वयात अवगत केलेल्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.