Viral video: दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. कुत्रे हे प्रामाणिकच नाही तर माणसाचं सर्वोत्तम मित्र असतात असं म्हटलं जातं. कुत्र्यांना बोलता येत नसलं, तरी ते माणसांत राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. आणि त्यांचं पालनही करतात. कुत्र्यांचे असेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतातात, ज्यात कुत्रे मालकावर किती प्रमे करतात, त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे वेळोवेळी सिद्ध होतं. मालकाबद्दल त्यांच्या मनात कधीही कटू भावना येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुत्रा आपल्या मालकाला नवीन झाडाचं रोपटं लावायला मदत करत आहे. रोपटं लावण्यासाठी माती बाजूला करायला लागते. यावेळी मालक कुत्र्याला फक्त खुणावतो आणि कुत्रा माती काढायचं काम क्षणात करुन देतो. मात्र तुम्हाला वाटत असेल की मालकाचं काम सोप्पं झालं तर तसं नाही याउलटं मालकाचं काम वाढलं. कुत्र्याने केलेल्या मदतीमुळे मालकाचे काम वाढते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मालक रोपासाठी खड्डा खणत आहे, जेव्हा कुत्रा त्याला मदत करण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त माती काढतो. कुत्र्याला असे करताना पाहून मालक त्याला थांबवतो. जगभरात जवळपास प्रत्येकाच्या घरी पाळीव प्राणी असतात. पाळीव प्राण्यांना ते आपल्या कुटुंबाप्रमाणेच जीवही लावतात. आणि पाळीव प्राण्यांचाही आपल्या मालकांसोबतचा जिव्हाळा पहायला मिळत असतो. 

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ पाणघोडा अन् खतरनाक मगरी आमने-सामने; पाहा कोण कुणावर ठरलं भारी?

 हा व्हिडिओ @Yoda4ever नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्रा आणि मालक यांच्यातील हे गोंडस नातेसंबंध तुमचं नक्कीच मन जिंकेल.