Pakistan Petrol Price Viral Video: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाही आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. भारतात ज्या वस्तू सर्वसामान्य लोक खरेदी करू शकतात. त्याच वस्तू पाकिस्तानात खरेदी करणे श्रीमंताच्या हाताबाहेर गेले आहे. पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

दरम्यान, एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पाकिस्तानमधील पेट्रोलच्या किमतीची माहिती देत ​​आहे. त्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनवला आणि सुमारे सात दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला, जो आता खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत किती आहे, हे सांगितले आहे.

(हे ही वाचा : पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही! जुगाडद्वारे बनविला वॅगनआर कारचा टेम्पो; VIDEO पाहून युजर्स अवाक् )

पाकिस्तानात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधून एक व्हिडिओ व्हायरल होताच लोक तो मोठ्या उत्सुकतेने पाहतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती पेट्रोल पंपावर उभा आहे आणि आपल्या कारमध्ये पेट्रोल भरत आहे. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती बदलत असल्याचे दाखवले. पेट्रोल मशीनवर कॅमेरा ठेवताना व्यक्ती दाखवते की, एक लिटर पेट्रोलची किंमत २७८.६ रुपये (पाकिस्तानी रुपये) आहे. या व्यक्तीने सात दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला होता जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर gaffar_musafir नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ २५ लाख लोकांनी पाहिला आहे आणि ५६ हजार लोकांनी पसंत केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.