Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लग्नातील उखाणे, डान्स, गाण्याचे अनेक व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नात पाहूण्यांना स्टेजवर नाचताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा मोह आवरला नाही आणि ते सुद्धा बिनधास्त नाचले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओत स्टेजवर पाहूणे मंडळी मनसोक्त नाचताना दिसत आहे.प्रत्येक जण डान्स करताना दिसत आहे. नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे. या सर्वांचा व्हिडीओ शूट करताना काही फोटोग्राफर लोकही स्टेज खाली उभे असलेले दिसताहेत. या सर्वांना डान्स करताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा मोह आवरत नाही आणि त्यांना सुद्धा डान्स करावासा वाटतो. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की फोटोग्राफर्स कॅमेरा हातात घेऊन डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना ते शूट सुद्धा करत आहे. लग्नातील हा भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओत सर्व जण झिंग झिंग झिंगाट या लोकप्रिय मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “जेव्हा क्लाइंट घरच्यासारखे भेटते तेव्हा फोटोग्राफर”

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : चूक कोणाची? दोन दुचाकी अन् ट्रक; अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल

tushar_pulate_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या सोहळ्यांमध्ये आम्हा कलाकारांचा सहभाग” हा व्हिडीओ एका फोटोग्राफरने त्याच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही मजा मराठी लोकांच्या लग्नातच येते” तर एका युजरने फोटोग्राफरला विचारलेय, “दादा माझ्या लग्नात येशील का तू.. खूप छान व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधणे, हाच कलाकाराचा स्वभाव असतो.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.