एका हातात गुलाबाचं फुलं, दुसऱ्या हातात अंगठी आणि गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज करण्याची फिल्मी स्टाईल आजच्या तरुणांच्या दृष्टीनं जुनी झाली. त्यामुळे वेगवेगळ्या स्टाईलनं आपल्या प्रेयसीला प्रेपोज करण्याचा नवा ट्रेंडच जणू आला आहे. अमेरिकेतील एका विमानात असं काहीसं घडलं. डेट्रॉइटमधून एक विमान निघालं होतं, विमानात नेहमीसारख्या प्रवाशांना सूचना दिल्या जात होत्या. पण, थोड्यावेळानं मात्र वेगळीच सुचना ऐकू येत असल्यानं सगळेच प्रवासी कान देऊन सुचना ऐकू लागले. इतर प्रवाशांना काही चालू आहे हे कळायच्या आतच वैमानिकानं तिथल्या एअर हॉस्टेसला चक्क लग्नाची मागणी घातली. हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जॉन इमरसन असं या पायलेटचं नाव आहे, तर लॉरेन असं एअर हॉस्टेसचं नाव आहे. जॉननं लग्नाची मागणी घालत लॉरेनला हिऱ्याची अंगठी दिली. लॉरेनं ती लगेच स्विकारली. जॉनला लॉरेनकडून होकार मिळाल्यावर विमानातल्या उपस्थित असलेल्या साऱ्या प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाट करून या दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.