PM Narendra Modi Singing Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक गाणी व्हायरल होत असतात. पण अलीकडे, प्रख्यात गायक मुकेश यांनी गायलेले ‘अनारी’ चित्रपटातील राज कपूरचे प्रसिद्ध बॉलीवूड गाणे ‘किसी की मुस्कुराहटों पे’ हे मोदींच्या आवाजात तुफान व्हायरल झाले आहे. या ऑडिओ क्लिपमधील मोदींचा आवाज इतका खरा वाटतोय की काही क्षणांसाठी सगळेच थक्क झाले होते. मात्र लाईटहाऊस जर्नालिझमला या व्हिडिओमागील वेगळीच बाजू लक्षात आली आहे. ती नेमकी काय हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

फेसबुज यूजर Raj Kumar Gupta Lalganj यांनी फेसबुकला ही पोस्ट शेअर केली होती.

आम्हाला आढळले की इतर अनेक वापरकर्ते देखील याच दाव्यासह गाणे शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून दाव्याचा तपास सुरु केला. आम्हाला याविषयी बातम्या देणारी कोणतीही विश्वासार्ह मीडिया संस्था सापडली नाही. तसेच, गाणे काळजीपूर्वक ऐकल्यावर काही त्रुटी आम्हाला त्यात आढळल्या आणि गाण्यात एक नीरस स्वभाव होता, ज्यामुळे हे AI निर्मित असू शकते असे आमच्या लक्षात आले. आम्ही फेसबुकवरून व्हिडिओ डाउनलोड केला आणि एमपी 3 फॉरमॅटमध्ये रूपांतरित केला. त्यानंतर आम्ही हा ऑडिओ ‘ऑप्टिक एआय ऑर नॉट’ एआय डिटेक्टर वर अपलोड केला.

यावरून असे लक्षात आले की, ऑडिओ AI निर्मित असू शकतो. आम्ही हा ऑडिओ IIT जोधपूरच्या टीमने विकसित केलेल्या itisaar.ai या दुसऱ्या AI डिटेक्टरवर अपलोड केला. टूलमुळे हे समजले की हा एक डीपफेक ऑडिओ आहे.

हे ही वाचा<< राहुल गांधींच्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ‘या’ जागांवरून चीनच्या भीतीने घेतला काढता पाय? ‘त्या’ पोस्टचा अर्थ काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘किसी की मुस्कुराहटों पे’ हे गाणं गायलेलं नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या पोस्ट मधील ऑडिओ तयार केला गेला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.