प्रसिद्ध भारतीय YouTuber चं अपघाती निधन; विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत दुर्दैवी अंत | Popular YouTuber Abhiyuday Mishra aka SkyLord dies in road bike accident scsg 91 | Loksatta

प्रसिद्ध भारतीय YouTuber चं अपघाती निधन; विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत दुर्दैवी अंत

राज्य सरकारने पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोहिमेदरम्यान घडला हा विचित्र अपघात

प्रसिद्ध भारतीय YouTuber चं अपघाती निधन; विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत दुर्दैवी अंत
मध्य प्रदेशमध्ये झाला अपघात (फोटो युट्यूबवरुन साभार)

लोकप्रिय कंटेट क्रिएटर असणाऱ्या अभ्युदय मिश्राचं अपघाती निधन झालं आहे. ‘स्कायलॉर्ड’ नावाने लोकप्रिय असणाऱ्या या युट्यूबरच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभ्युदयचा मृत्यू झाला. सोमवारी २६ तारखेलाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभ्युदयचं ‘स्कायलॉर्ड’ हे युट्यूब चॅनेल फ्री फायर आणि भारतीय गेमिंग कम्युनिटीमध्ये फारच लोकप्रिय होतं. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तो जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होता. यावेळी त्याच्यासोबत इतर बाईकचालकही होते. ‘एमपी ट्युरिजम रायडींग टूअर’ नावाच्या दौऱ्यावर असतानाच त्याचा अपघात झाला.

बाईकवरुन मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील पर्यटनासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशातून मध्य प्रदेश राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या मदतीने ही मोहीम सुरु करण्यात आलेली. ‘दैनिक भास्कर’च्या हवाल्याने ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार एका ट्रकने अभ्युदयच्या बाईकला धडक दिल्याने अपघात घडला.

नर्मदापूरम- पिपारीया राज्य महामार्गावर सोहागपूर येथे हा अपघात झाला. राज्य महामार्ग २२ वर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने घडक दिल्याने अभ्युदय गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं.

अभ्युदयची प्रकृती खालावत गेल्याने त्याला नर्मदापूरम येथे हलवण्यात आलं. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला भोपाळमधील भंन्सल रुग्णालयामध्ये दाखल करताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी ट्रक चालाकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असून अद्याप ट्रक चालकाला अटक करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Optical Illusion: शेतात लपलाय भयानक साप; अवघ्या १५ सेकंदात शोधणारे ठरतील ‘सुपर स्मार्ट’

संबंधित बातम्या

Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य