Porsche Car Accident With Bike : तरुणांना बाईक चालविताना स्टंटबाजीची फारच हौस असते. खतरनाक स्टंट करून लोकांना चकित करण्यासह मित्रांमध्ये वाहवा करून घ्यायला त्यांना आवडते. त्यात स्टंटबाजी करीत सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही तरुण काहीही करायला तयार होतात. अशाने ते स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. लाइक्स आणि व्ह्युजच्या नादात ते आपल्या जीवाशी खेळतात, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक बाईकस्वार पोर्श कारबरोबर रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो बाईक इतक्या वेगाने पळवतो की, त्याला ती सावरणेही कठीण होते; ज्यामुळे भरधाव बाईकवरून तोल जाऊन तो खाली पडतो आणि मग पुढे नेमके नको तेच घडते. या तरुणाचा इतका भीषण अपघात झाला की, त्याचा व्हिडीओ पाहताना तुमच्याही काळजात धडकी भरेल.

बाइकस्वाराला पोर्श कारबरोबर रेसिंगची हौस

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक बाईकस्वार पोर्श कारशी शर्यत करण्याचा प्रयत्न करीत आहे. शर्यत सुरू होताच बाईकस्वार वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवतो आणि स्टंट करायला सुरुवात करतो. त्यावेळी त्याने बाईकचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न केला; पण त्याला स्पीडमुळे बाईकचे वजन न झेपल्याने त्याचा तोल गेला. बाईकचा वेग इतका जास्त होता की, तोल गेल्याने बाईकवरून उडून तो खाली पडला. त्यानंतर बाईकसह तोही पाच ते सहा वेळा कोलांटउड्या घेत पुढे जाऊन पडला. बरंच अंतर रस्त्यावर फरपटत गेल्यानंतर तो तरुण पुढे जाऊन उभा राहिला. हा अपघात इतका भीषण होता की, ज्यात बाईकचा अक्षरश: चक्काचूर झाला; मात्र बाईक चालविताना त्याने सुरक्षित स्वरूपाचे कपडे परिधान केले असल्याने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हा भीषण अपघात पाहताना आपल्याही काळजाचे पाणी पाणी होते.

VIDEO : कोकण रेल्वेत तोबा गर्दी, प्रवाशांची पोलिसांकडून अडवणूक अन् बाचाबाची; पनवेल स्थानकात नेमके घडले काय?

या भीषण अपघाताचा व्हिडीओ @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर आता अनेकांनी असे स्टंट करणे जीवघेणे ठरू शकते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, लोकांनी मस्करीतही असा मूर्खपणा करू नयेत. त्यामुळे जीवही जाऊ शकतो. दुसऱ्याने लिहिले की, ही गमतीत घेण्यासारखी गोष्ट नाही. त्यात एखाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो.

तिसऱ्या युजरने लिहिले की, अशा प्रकारे रेसिंग करणे म्हणजे आपले स्वत:वरील नियंत्रण गमावून बसणे; जे धोकादायक असू शकते. चौथ्याने लिहिले की, स्टंटबाजांबरोबर अशा घटना घडत राहतात, यात नवीन काय?