Premium

Viral: कपलचं चक्क किंग कोब्रासोबत प्रि-वेडींग शूट; नेटकरी संतापले..म्हणाले “मराठा सेवा संघाचा निर्णय”

Pre-wedding photoshoot: सोशल मीडियावर एक विचित्र प्री-वेडिंग शूट व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

pre wedding photoshoot with cobra goes viral
नागा सोबत केलं प्री-वेडिंग फोटोशूट

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. लग्नापूर्वी अनेक जोडपे एकत्र येत फोटो आणि व्हिडिओसेशन करण्यास प्राधान्य देत आहे. पूर्वी लग्नात फोटोंची हौस भागवून घेतली जात होती. आणि आता लग्नाआधीच म्हणजे प्री-वेडिंग शूटचं फॅड आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. परंतु आता अफाट खर्च येणाऱ्या या प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा ठराव मराठा सेवा संघाने पास केला आहे. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर एक विचित्र प्री-वेडिंग शूट व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. आपला लग्न सोहळा लक्षात राहावा यासाठी लोकं प्री वेडिंग शूट मध्ये नव्या लोकेशन्ससोबतच काही वेगळ्या थीम्सचाही शोध घेतात. सध्या असेच एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एक नाग वधू-वरांसोबत पोज देताना दिसतोय. तुम्ही अनेक प्री-वेडिंग फोटोशूट पाहिले असतील, पण तुम्ही कोणाला नागा सोबत पोज देताना पाहिलं आहे का? असंच काहीतरी करून एका जोडप्याने हद्द पार केली आहे. यामध्ये एक मुलगा आणि मुलगी कसे भेटतात आणि मग प्रेमात पडतात हे फोटोंच्या माध्यमातून दिसत आहे. सगळ्यात गंमत म्हणजे दोघांची भेट. झाली अशी की, मुलगी घराबाहेर फिरत असताना तिला नागाचा सामना करावा लागतो. मग स्नेक कॅचर बॉय आपला जीव वाचवतो आणि मग पहिल्या नजरेत तिला त्याच्यावर प्रेम होते. अशी स्टोरी रंगवण्यात आली आली आहे.

पाहा फोटो

हेही वाचा – Video: म्हशीने सिंहिणीला थेट शिंगावरच घेतलं अन्.. शिकारीचा थरार कॅमेरात कैद

ग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवी प्रथा सध्या रूढ होऊ लागली आहे. लग्नाच्या आधी होणारे नवरा-नवरी फोटोशूट करून घेतात. मात्र हे विचित्र फोटोशूट पाहून सर्पमित्र चांगलेच संतापले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हजारोवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तर नेटकरीही फोटो पाहून संतापले असून संतप्त प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने म्हंटलं आहे की म्हणूनच मराठा सेवा संघाने यावर बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 12:11 IST
Next Story
Odisha: दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना…ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रा संतापले, म्हणाले “सुरक्षा यंत्रणा पडताळा”