Premium

Video: म्हशीने सिंहिणीला थेट शिंगावरच घेतलं अन्.. शिकारीचा थरार कॅमेरात कैद

Viral video: दोन बायकांमध्ये भांडणं झाली की, त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही म्हस आणि सिंहिणीमध्ये जोरदार भांडण झालं आहे.

Buffalo hit the lioness video viral
म्हशी आणि सिंहिणीमध्ये तुफान भांडण

प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिकारीच्या थराराच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. कोण कधी कोणावर हल्ला करेल आणि जीव वाचवण्यासाठी कोण शरणागती पत्करेल हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळतं. सध्या असाच एक म्हशींचा आणि सिंहिणीचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला माहितीच आहे, दोन बायकांमध्ये भांडणं झाली की, त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही म्हस आणि सिंहिणीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, म्हशींचा कळप रस्त्याच्या कडेला उभा आहे. तेवढ्यात तिकडे एक सिंहिण येते आणि म्हशींवर हल्ला करते, मात्र म्हशीही मागे हटत नाही त्यासुद्धा सिंहीणीवर प्रतीहल्ला करतात. एक म्हस भांडणात जखमी होते, तेवढ्यात दुसरी म्हस सिंहिणीला शिंगावर उचलून घेते. ती दोनदा सिंहिणीला शिंगावर उचलून जोरात आपटते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: झोपलेल्या कुत्र्याला त्रास देणं आलं अंगलट; मुलीला असा धडा शिकवला की थेट…

म्हशी आणि सिहिंणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज आले असून नेटकरी खूप साऱ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओ एक पेक्षा अधिक वेळा पाहिला जातोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 10:09 IST
Next Story
अपघातामुळे रुळावरुन घसरलेली रेल्वे पुन्हा रुळावर कशी नेली जाते? पाहा Video