भारतात टॅलेंटची कमी नाही, असं म्हटलं जातं, होय ते सत्यच आहे. कारण दिवसेंदिवस व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक कलाकारांचे कौशल्य लोकांच्या समोर येत आहे. रात्रंदिवस समाजातील नागरिकांचा सुरक्षा करणे आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पोलीस कर्मचारी करत असातात. त्यामुळे पोलिसांमध्ये असलेला छुपा टॅलेंट समाजासमोर येण्यासाठी अनेकदा संधी मिळत नाही. परंतु, फावळा वेळ मिळाला की, काही पोलीस कर्मचारी आपल्या आवडीचा छंद जोपासतात. पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनीही त्यांच्यातील जबरदस्त टॅलेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणला आहे.
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांनी गायलेलं “दिल संभल जा जरा” हे गाणं घोरपडे यांनी गायलं आहे. गाणं स्टुडीओमध्ये रेकॉर्ड करुन ते इन्स्टाग्रावर पोस्ट केलं आहे. मर्डर २ सिनेमातील दिल संभल जा जरा हे गाणं घोरपडे यांनी अत्यंत सुरेल आवाजात गायलं आहे. कारण त्यांनी शेअर केलेलं गाणं इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.घोरपडे यांनी मायक्रोफोन समोर उभं राहून अत्यंत मधूर वाणीत हे गाणं गायलं आहे. “दिल संभल जा जरा” असं या गाण्याचे बोल आहेत. ८ डिसेंबरला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तेव्हापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून गाण्यावर कमेंट्सचा वर्षावही होत आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, “खूपच छान भाऊ”. दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं, “सुपर सर”. घोरपडे यांनी यापूर्वीही त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अभिनेते अजय देवगण यांच्या भूज सिनेमातील गाणंही त्यांनी गायलं होतं. या गाण्यालाही नेटकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. देश मेरे हे गाणं गायल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या संगीत कौशल्याचं कौतुकही केलं होतं. पुणे पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता.